नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या
नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

42022
मुगळी : महात्मा गांधी वाचनालयात एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी बसाप्पा उरमनहटी, बी. जी. स्वामी, तुकाराम महाडिक, सुरेश धनवडे आदी.

मुगळी वाचनालयात रंगनाथन जयंती
नूल : मुगळी (गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. ‘एसबीआय’चे बसाप्पा उरमनहटी यांची प्रमुख उपस्थिती होती. उरमनहटी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असल्याचे उरमनहट्टी यांनी सांगितले. सरपंच बी. जी. स्वामी, तुकाराम महाडिक, सुरेश धनवडे, सुरेश पाटील, विजय महाडिक, किशोर मुसळे, बाळापा माने, आप्पासाहेब कदम, सागर आरबोळे, शंकर माने, गजानन कांबळे, के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी, योगेश धनवडे, गौरव भोसले आदी उपस्थित होते. ए. बी. जाधव यांनी स्वागत केले. ईश्‍वर हुल्लोळी यांनी आभार मानले.
----------------
रामनाथगिरी मठात
१८ ला भंडारा उत्सव
नूल (ता. गडहिंग्लज) ः येथील श्री रामनाथगिरी समाधी मठात भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ऑगस्टला हा उत्सव होईल. मठाधीश भगवानगिरी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी अभिषेक, त्यानंतर महारुद्र स्वाहाकार होईल. सकाळी दहाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल. दुपारी दोनला न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर रिंगण सोहळ्याचे आयोजन केले आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85547 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..