हरळीच्या महालक्ष्मीची मे महिन्यात होणार यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरळीच्या महालक्ष्मीची मे महिन्यात होणार यात्रा
हरळीच्या महालक्ष्मीची मे महिन्यात होणार यात्रा

हरळीच्या महालक्ष्मीची मे महिन्यात होणार यात्रा

sakal_logo
By

हरळीच्या महालक्ष्मीची
मे महिन्यात होणार यात्रा
गडहिंग्लज, ता. ९ : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी देवीची यात्रा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. तेरा वर्षांनंतर ही यात्रा होत आहे. २ ते ४ मे २०२३ या कालावधीत यात्रा होणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यात्रेसंदर्भातील विविध कामांचे नियोजन करण्यात आले. यात्रेच्या काळात गावात एकोपा राहावा, यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना एकाच प्रकारचे टी-शर्ट दिले जाणार आहेत. गावात वैयक्तिक स्वरुपाचे डिजिटल फलक लावण्यावर बंदी घातली आहे. कांबळे, लोहार, सुतार, परीट समाजातील प्रतिनिधींवर धार्मिक विधीची, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, दुकानगाळे, शासकीय परवानगीची ग्रामपंचायतीवर, वाहन पार्किंग, स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची यात्रा समितीवर जबाबदारी सोपविली आहे. मंदिर व मूर्तीची रंगरंगोटी, परिसराचे सुशोभिकरण याचे नियोजन करण्यात आले. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत साडेचार लाख रुपयांची देणगी जमा झाली आहे. प्रतिमाणसी ७०० रुपये वर्गणी जमा करण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीला यात्रा समिती, ग्रामपंचायत, विविध संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गटांचे पदाधिकारी, मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85604 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..