राजापूर ः कुणबी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः कुणबी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे
राजापूर ः कुणबी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे

राजापूर ः कुणबी सहकारी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे

sakal_logo
By

rat९p३८.jpg ः KOP२२L४२००४
राजापूर ः राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या भांबेड शाखेचा आरंभ करताना राजन देसाई. अजित यशवंतराव, चेअरमन प्रकाश मांडवकर आदी.


कुणबी पतसंस्थेचे बँकेत रूपांतर व्हावे
राजन देसाई ;२८ वर्षे अविरत सेवा देणारी पतसंस्था
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी ही संस्था १९९४ ला स्थापन झाली आहे. गेली २८ वर्षे अविरतपणे सेवा देणारी ही एकमेव पतसंस्था असून या पतसंस्थेचे लवकरच बँकेत रूपांतर व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि रिलायन्स एनर्जीचे माजी डेप्युटी जनरल मॅनेजर राजन देसाई यांनी केले. देसाई यांच्या हस्ते कुणबी पतसंस्थेच्या भांबेड येथील अकराव्या शाखेचा तर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या हस्ते एटीएमचा आरंभ झाला.
यशवंतराव यांनी जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष बावकर यांनी आर्थिक मंदीच्या काळात संस्थेने केलेली प्रगती वाखणण्याजोगी असल्याचे गौरवोद्गार काढले. पतसंस्थेचे अध्यक्ष मांडवकर यांनी अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये संस्थेच्या तीन शाखा व २० कोटीचा व्यवसाय त्यानंतर झालेल्या नवीन ९ शाखा आणि अधिकचा ६० कोटीचा व्यवसाय करत असताना आलेला सुखद अनुभव सांगताना चालू आर्थिक वर्षात १०० कोटीचा व्यवसाय पार करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. प्रस्तावना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटकर यांनी तर सूत्रसंचालन अविनाश नवाळे यांनी केले.चंद्रकांत बावकर, महेश खामकर, श्रीकृष्ण उर्फ बब्या हेगिष्टे, गुणाजी शिवगण, अनंत टक्के, भांबेडच्या सरपंच उज्ज्वला मढवी, उपसरपंच राजेंद्र गांधी, श्रीकांत ठाकूरदेसाई, शरद लाखण, चंद्रकांत धनावडे, बाळकृष्ण तांबे, जितेंद्र पाटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85623 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..