व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे लेखन करा, प्रा. प्रविण बांदेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे लेखन करा, प्रा. प्रविण बांदेकर
व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे लेखन करा, प्रा. प्रविण बांदेकर

व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे लेखन करा, प्रा. प्रविण बांदेकर

sakal_logo
By

42105
आजरा : येथील प्रागतिक जनवादी विचारमंचच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. प्रवीण बांदेकर. या वेळी उपस्थित प्रा. राजा शिरगुप्पे, संपत देसाई, प्रा. सुभाष कोरे, प्रा. दशरथ सांगळे.

व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे लेखन करा
प्रा. प्रवीण बांदेकर; प्रागतिक जनवादी विचारमंचचे उद्‍घाटन, कविसंमेलन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १० : सध्याचा काळ संभ्रम निर्माण करणारा आहे. तशी परिस्थिती तयार केली जात आहे. अशा काळात वास्तववादी लेखन करणे हे प्रत्येक साहित्यिक व विचारवंताची जबाबदारी बनली आहे. व्यवस्थेला प्रश्‍न विचारणारे, त्याला ठणकावणारे लेखन साहित्यिकांनी करायला हवे. बुद्धीला, मनाला जे पटते ते लिहावे, असे परखड मत कवी व कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांनी मांडले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात प्रागतिक जनवादी साहित्य मंचचे उद्‍घाटन प्रसंगी प्रा. बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील नव लेखन करणारे कवींचे संमेलन झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजा शिरगुप्पे प्रमुख उपस्थित होते.
प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. संपत देसाई यांनी प्रास्ताविकात मंचच्या स्थापनेची भूमिका स्पष्ट केली. प्रा. बांदेकर म्हणाले, ‘‘सध्याची पिढी ग्रंथापासून दूर जात आहे. चांगले व सकस वाचणार नसाल तर तुम्ही निर्भयपणे लिहू शकणार नाही. व्यवस्थेचा कावा तुम्हाला ओळखता आला पाहिजेत. समाजातील वास्तव आपल्या लेखनातून मांडता आले पाहिजेत. हे मांडता आले नाही तर तो वैचारिक व्यभिचार ठरेल. लेखक बनण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालणारी असते. ही एक शोधाची प्रक्रिया असते. आपल्या मनाला व बुद्धीला पटेल ते लिहता आले पाहिजेत. स्वतःचा आत्मशोध घेता आला पाहिजेत. लेखनामध्ये स्वतःचा चेहरा, प्रतिबिंब दिसायला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी लेखन करू नये. स्वतःची भूमिका स्पष्ट करता आली पाहिजे. प्रा. शिरगुप्पे म्हणाले, ‘‘लिहणाऱ्यांना बळ देण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन मंच काम करणार आहे. चांगले व सकस कसे लिहावे यासाठी लेखनाच्या कार्यशाळा होतील. या तालुक्यातील साहित्यिकांची परंपरा मोठी आहे. पुढे हा समृद्ध वारसा चालवावा लागेल.’’ या वेळी वीस कवींनी कविता सादर केल्या.
डॉ. शिवशंकर उपासे, प्रा. सुनील शिंत्रे, प्रा. नवनाथ शिंदे, प्रा. दशरथ सांगळे, अभियंता सुनील पाटील, सुरेश दास, श्रृती पुंडपळ, संजय घाटगे, सुनीता खाडे, वैष्णवी पाडले, अशोक शिंदे, कृष्णा सावंत, युवराज जाधव, गीता पोतदार, चंद्रनील सावंत, नंदू साळुंखे, डॉ. सचिन पोवार, संजना पोवार उपस्थित होते. अनुष्का गोवेकर व सुरेखा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कोरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85682 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..