‘सिस्टीम’च्या आवाजाने बहिरेपणाचा धोका : अशी घ्या काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dj in weddings
सिस्टीममुळे कायमचे ऐकू येणे बंद होते...

‘सिस्टीम’च्या आवाजाने बहिरेपणाचा धोका : अशी घ्या काळजी

कोल्हापूर - ‘सिस्टीम’च्या आवाजाने तुम्ही कायमचे बहिरे होऊ शकता, शंभर डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे शारीरिक आणि मानसिक आजारालाही आमंत्रण मिळते. कानांची काळजी घ्यायची असेल, तर शंभर डेसिबलपेक्षा अधिक आवाज ऐकू नका. सिस्टीमच्या आवाजाने कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, हे माहिती असतानाही अशा सिस्टीम ऐकण्यासाठी थांबणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. नवीन घोटणे यांनी सांगितले, ‘नेहमीचे बोलणे साधारणपणे ७०-८० डेसिबलपर्यंत असते. त्यामुळे कानावर फारसा ताण पडत नाही.’
मात्र, १०० डेसिबलवरच्या पुढे आवाज ऐकला, तर कानाच्या अंतरकर्णावर ताण पडतो. यामुळे केशतंतू खराब होऊ शकतात. यात असलेल्या सूक्ष्मकेसांना कायमचे नुकसान पोचते. यातून तात्पुरते आणि कायमचे बहिरेपण येते. साधारण चार ते सहा हजार हर्टबीटस (हाय फ्रिक्वेन्सी) मुळे कायमचा धोका पोचू शकतो. केशतंतू खराब झाल्यामुळे ऐकू कमी होते, बंद होते. कानाच्या पडद्यालाही फटका बसतो. १०० पेक्षा कमी डेसिबल आवाजातच ऐकले पाहिजे. विशेष म्हणजे शंभरपेक्षा अधिक डेसिबल अधिक काळ ऐकल्यानंतरही बहिरेपणाचा धोका वाढतो.

काळजी काय घ्यावी
कानात कापसाचे बोळे घालावेत. पोहताना असलेले एअर प्लग घालावे. हेडफोन वापरावा. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या कानाचा पडदा फाटलेला नाही, अशांनी कानात थोडे तेल घालावे. यामुळे आवाजाचा थेट मारा केशतंतूवर होत नाही. परिणामी काही प्रमाणात आवाजामुळे बहिरेपणा येणे टळू शकते.

एकाच ठिकाणी एकाच वेळी मोठा आवाज ऐकला तरीही कानाच्या पडद्याला आणि केशतंतूला फटका बसू शकतो. सिस्टीमसह एकाचवेळी होणाऱ्या आवाजामुळेही बहिरेपण येऊ शकते. यात मोठ्या फटाक्याचा आवाज, स्फोटाचा आवाज वगैरेमुळेही धोका आहे. अशा आवाजापासूनही दूर राहणे आवश्‍यक आहे.
- डॉ. नवीन घोटणे, कान, नाक, घसा तज्ज्ञ.

हे होऊ शकते..
१०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाच्या सिस्टीमुळे शारीरिक आणि मानसिक आजाराला सुद्धा आमंत्रण मिळते. चिडचिड होणे, रक्तदाब वाढणे, डोकं भिनभिनने, शांत ठिकाणी जावे वाटणे, एकटे राहण्याची भावना होणे असेही आजार सिस्टीमच्या आवाजामुळे होऊ शकतात. असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85685 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SystemNoise Pollution