आजऱ्यात कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात कॉंग्रेसतर्फे
आझादी गौरव झेंडा यात्रा
आजऱ्यात कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा यात्रा

आजऱ्यात कॉंग्रेसतर्फे आझादी गौरव झेंडा यात्रा

sakal_logo
By

आजऱ्यात काँग्रेसतर्फे
आझादी गौरव झेंडा यात्रा
आजरा, ता. ९ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसतर्फे आजरा शहरात आझादी गौरव झेंडा यात्रा झाली. क्रांतिदिनानिमित्त ही यात्रा झाली. स्वातंत्र्याच्या लढ्यात कॉँग्रेसने मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिले. त्याची आठवण म्हणून ही यात्रा होत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. पंचायत समितीपासून यात्रेला सुरवात झाली. संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवरायांचा पुतळा ते पुन्हा पंचायत समिती अशी यात्रा झाली. ‘गोकुळ’च्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघाली. पदयात्रेत भैरवी सावंत, रवी भाटले, किरण पाटील, नौशाद बुड्डेखान, विश्‍वास चव्हाण, सुधीर पाटील, विजय पोवार, उतम होडगे, नेताजी निउंगरे, पांडुरंग केसरकर, पांडुरंग ढवळे, दशरथ होलम, उदय पाटील, सुजाता कळेकर, माधुरी पाचवडेकर, छाया शिंदे, मुक्ता चव्हाण, बाबूराव धुमाळे, नवीन देसाई, बाळासाहेब पाटील, इकबाल शेख, पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85710 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..