अभिनेता भरत जाधव पत्रपरिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेता भरत जाधव पत्रपरिषद
अभिनेता भरत जाधव पत्रपरिषद

अभिनेता भरत जाधव पत्रपरिषद

sakal_logo
By

42127

‘पुन्हा सही रे सही’ला
रसिकांचे भरभरून प्रेम
अभिनेता भरत जाधव, नाटकाचे सोमवारी एकवीसाव्या वर्षांत पदार्पण
कोल्हापूर, ता. ९ ः मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं अजरामर झाली. या नाटकांनी आणि त्यातील कलाकारांचं गारूड आजही रसिकमनावर आहे. असेच एक सदाबहार विनोदी नाटक म्हणजे ‘सही रे सही’. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना हे नाटकही एकवीसाव्या वर्षांत पदार्पण करणार आहे. दरम्यान, नाटकाला गेली दोन दशकं रसिकांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच देशाबरोबरच परदेशातही नाटकाचे प्रयोग करू शकलो, असे आज अभिनेता भरत जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला आणि पहिल्याच वर्षात ३६५ दिवसांत ५६७ प्रयोग हे हाऊसफुल्ल झाले. जागतिक रंगभूमीवरही या नाटकाला रसिकांनी डोक्यावर घेतले. इस्त्रायल, कॅनडा आणि अमेरिका येथे हाऊसफुल्ल प्रयोग झाले. कोरोना काळात नाट्यसृष्टी काही काळासाठी थांबली आणि भरत जाधव एंटरटेन्मेंट या बॅनरखाली ‘पुन्हा सही रे सही’ नावाने हे नाटक रंगभूमीवर आले. केदार शिंदे यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या आजवर या नाटकाचे चार हजार शंभरहून अधिक प्रयोग झाले असून, वर्षभरात पाच हजार प्रयोगांचा टप्पा हे नाटक गाठणार आहे.
शनिवार (ता. १३) पासून या नाटकाचे प्रयोग आता रंगणार आहेत. १३ ऑगस्टला सातारा, १४ ला सांगली आणि १६ ला बेळगावला या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. भरत जाधव हे मूळचे कोल्हापूरचे. साहजिकच, एकवीसाव्या वर्षांत प्रवेश करताना पंधरा ऑगस्टचा प्रयोग येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. सायंकाळी साडेचारला होणाऱ्या या प्रयोगाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य वितरक व वैभव एंटरप्रायजेसचे संजय लोंढे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85719 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..