मनाला चटका लावणारा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनाला चटका लावणारा मृत्यू
मनाला चटका लावणारा मृत्यू

मनाला चटका लावणारा मृत्यू

sakal_logo
By

तीन वर्षांच्या बालकाची
एक्झिट चटका लावणारी
हुपरीतील घटना; स्वयंपाक घरात कट्ट्यावरून पडून जखमी
सकाळ वृत्तसेवा
हुपरी, ता. ९ ः राहत्या घरी स्वयंपाक घरात कट्ट्यावरून पडून जखमी झालेल्या तीन वर्षांच्या बालकाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. सर्फराज सादिक पटेल (सध्या हुपरी) असे त्याचे नाव आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
पोलिसांनी सांगितले, पटेल कुटुंब मुळचे हेरले (ता. हातकणंगले) त्यांचे लाईन बाजार येथे घर आहे. सध्या ते कामानिमित्त हुपरी येथे राहत आहेत. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा सर्फराज हा ४ ऑगस्टला सकाळी घरातील किचन कट्ट्यावरून पडून जखमी झाला. त्याला घरच्यांनी तातडीने इचलकरंजीतील खासगी आणि त्यानंतर कोल्हापुरातील आणखी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला ७ ऑगस्टला सीपीआरमध्ये दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याचा आज दुपारी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती.

नातेवाईकांचा आक्रोश
तीन वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावणारा होता. सीपीआरमध्ये नातेवाईकांनी आक्रोश केला. हे दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारे होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85720 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..