इचल : होडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : होडी स्पर्धा
इचल : होडी स्पर्धा

इचल : होडी स्पर्धा

sakal_logo
By

ich98,9.jpg
---
42142 ( ४ कॉलम फोटो बातमीवर)
ॅइचलकरंजी पंचगंगा नदीपात्रात मंगळवारी सायंकाळी चुरशीने होड्यांच्या शर्यती झाल्या.
-
42143
इचलकरंजी ः पहिल्या क्रमांकाच्या सांगलवाडीच्या रॉयल कृष्णाबोट क्लबला बक्षीस देताना भगतराम छाबडा यांच्यासह स्वप्नील आवाडे, प्रकाश दत्तवाडे आदी.
-----
सांगलवाडीचा रॉयल कृष्णा क्लब प्रथम
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे होड्यांच्या शर्यती

इचलकरंजी, ता. ९ ः इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे क्रांती दिनानिमित्त आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लब (अ) ने सलग ति‍ऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदा पटकावली, तर इचलकरंजीच्या वरद विनायक भक्त मंडळ बोट क्लबने दुसरा, सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने तृतीय आणि इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबने चौथा क्रमांक मिळविला. क्रांती दिनानिमित्त स्पर्धा झाली.
शर्यतीचा प्रारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते व गोल्ड विंग फौंडेशनच्या अध्यक्षा मौश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
उद्योजक भगतराम छाबडा, आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, दत्तात्रय जोशी, प्रकाश दत्तवाडे, दीपक राशिनकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अ‍ॅड. भरत जोशी, पै.अमृत भोसले, बेंदूर उत्सव मंडळाचे बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नंदु पाटील, पापालाल मुजावर, संपत जामदार, राहुल घाट, राजेंद्र बचाटे, तानाजी कोकितकर, राजू कलावंत, राजू दरीबे, सागर गळतगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, शशिकांत नेजे, सागर कम्मे, सागर मगदूम, योगेश पाटील, बबलु हावळे, शिवाजी काळे, बाबु रुग्गे, राजू कोरे, महावीर कुरुंदवाडे, नरसिंह पारीक, रविंद्र लोहार आदी उपस्थित होते.

चौकट
शौकिनांची मोठी गर्दी
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात क्रांती दिनानिमित्त शर्यती झाल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी शौकिनांमध्ये मोठी उत्सुकता होती. सद्या पूरस्थिती आहे, तर अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. तरीही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी नदीतिरावार मोठी गर्दी केली होती. शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85733 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..