ड्रेनेज विभागाला टाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रेनेज विभागाला टाळे
ड्रेनेज विभागाला टाळे

ड्रेनेज विभागाला टाळे

sakal_logo
By

42153
माजी महापौरांकडून
ड्रेनेज विभागाला टाळे
कोल्हापूर ः पावसामुळे कॉमर्स कॉलेज येथे ड्रेनेजलाईनमधून मैलायुक्त सांडपाणी वाहत असल्याची चार दिवस तक्रार करूनही महापालिकेकडून दुरुस्ती केली नसल्याने माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी संतापून आज ड्रेनेज विभागाला टाळे ठोकले. ड्रेनेजलाईन तुंबून मैला वारंवार रस्त्यावर वाहतो. नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने आजरेकर यांनी महानगरपालिका इमारतीतील ड्रेनेज विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. वारंवार फोन करूनही प्रशासनाकडून काहीच हालचाल केलेली नाही. मुंबईवरून मागवलेले जेट मशिनही आलेले नाही. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सखल भागात, कॉमर्स कॉलेज रस्‍त्यावर मैला वाहत असतो. काम झालं नाही तर उग्र आंदोलन केले जाईल, असे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85749 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..