अल्पवयिन मुलीचा विवाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयिन मुलीचा विवाह
अल्पवयिन मुलीचा विवाह

अल्पवयिन मुलीचा विवाह

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीचा विवाह;
आठ जणांवर गुन्हा दाखल
---
नातेवाइकांसह हॉल मालकाचाही समावेश
कोल्हापूर, ता. ९ ः अल्पवयीन मुलीच्या विवाहासह संगनमताने मदत केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोन्हीकडील नातेवाइकांसह भटजी आणि हॉल मालकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की करवीर तालुक्यातील एका गावातील हॉलमध्ये आज एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणी मुलीची आई, वडील, भावासह वर भगवान शिवाजी शेंडुरे, त्याची आई अंजना, वडील शिवाजी (सर्व रा. शिरोली दुमाला, ता. करवीर), भटजी शिवलिंग स्वामी, हॉल मालक अभिजित खंडेराव कारंडे अशा आठ संशयितांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद ग्रामविकास अधिकारी भोपळे यांनी दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले. याबाबत अंमलदार विजय गुरव अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85752 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..