गडहिंग्लजला हर घर तिरंगा, हर मन तिरंगा पथनाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला हर घर तिरंगा, हर मन तिरंगा पथनाट्य
गडहिंग्लजला हर घर तिरंगा, हर मन तिरंगा पथनाट्य

गडहिंग्लजला हर घर तिरंगा, हर मन तिरंगा पथनाट्य

sakal_logo
By

42236
गडहिंग्लज : दसरा चौकात ‘हर घर तिरंगा-हर मन तिरंगा’ पथनाट्य सादर करताना गडहिंग्लज कला अकादमीचे कलाकार. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

हर घर तिरंगा, हर मन तिरंगा
गडहिंग्लजला पथनाट्य; नगरपरिषद-कला अकादमीतर्फे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील नगरपरिषद व गडहिंग्लज कला अकादमी यांच्यातर्फे पथनाट्याचे सादरीकरण केले. हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, या विषयावरील पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. दसरा चौकात त्याचे सादरीकरण झाले. विशेष म्हणजे या पथनाट्यात मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनीही भूमिका वठविली.
पथनाट्याच्या सुरवातीला विविध देशभक्तीपर गीतांवर बालकलाकारांनी नृत्य सादर केले. त्यानंतर महाराष्ट्रातील संस्कृतीचे सादरीकरण झाले. शाळेतील दृष्याच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तिरंगा ध्वजाबद्दल असलेल्या प्रेमाची प्रचिती आली. मुख्याधिकारी खारगे यांनी शिक्षकाची भूमिका वटविली. नगरपरिषदेचे अधिकारी निखिल पाटील, धनंजय चव्हाण, अनिल गंधमवाड, अक्षय मोहिते यांनीही विविध भूमिका केल्या. या पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले. नृत्य दिग्दर्शन केंपान्ना कांबळे यांनी केले. कला अकादमीच्या ३० कलाकारांनी पथनाट्यात सहभाग घेतला होता. पथनाट्य पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85848 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..