आजऱ्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या ९४ गावात १६ हजार ध्वजांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या ९४ गावात १६ हजार ध्वजांचे वाटप
आजऱ्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या ९४ गावात १६ हजार ध्वजांचे वाटप

आजऱ्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या ९४ गावात १६ हजार ध्वजांचे वाटप

sakal_logo
By

42276
आजरा : येथील पंचायत समितीसमोर प्रबोधन रथाची सुरुवात झाली. या वेळी तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, उपअभियंता सूर्यकांत नाईक आदी.


आजऱ्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या
९४ गावांत १६ हजार ध्वजांचे वाटप
---
७० टक्के वाटप; गावोगावी प्रबोधनासाठी रॅली
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम शासनाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली. प्रत्येक घरावर तिरंगा फडकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी गावागावांत प्रबोधनासाठी रथ फिरविला जात असून, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, त्याचबरोबर तरुण मंडळे यांच्यातर्फे घरोघरी ध्वजसंहितेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तालुक्यात २६ हजार तिरंगा ध्वजांची गरज आहे. यात ७३ ग्रामपंचायतींच्या ९४ गावांत सुमारे १६ हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले.
शनिवार (ता. १३) ते सोमवार (ता. १५) या कालावधीत तिरंगा ध्वज ग्रामस्थांनी घरासमोर फडकवायचा आहे. याबाबत प्रशासनाने आवाहन केले. त्या पद्धतीने प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. याबाबत ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कृषी सहायक व शिक्षक सदस्य हे समितीत सहभागी आहेत. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे ध्वज पोचविण्याबरोबर ध्वजसंहितेचे पालन व्हावे, यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. आजरा पंचायत समितीकडे ७३ ग्रामपंचायतींनी १९ हजार ६०० ध्वजांची नोंद केली होती. १६ हजार ध्वजवाटप करण्यात आले. सुमारे ७० टक्के ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आले. ध्वजासाठी ग्रामस्थांकडून २१ रुपये इतकी रक्कम घेतली जाणार आहे. स्थानिक पातळीवर काही संस्था, सोसायट्या, दूधसंस्था या ध्वजाचे वाटप करणार आहेत. तहसीलदार विकास अहिर यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, पंचायत विस्तार अधिकारी पी. जी. चव्हाण, एस. टी. कराळे, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, पंचायत बांधकामचे उपअभियंता सूर्यकांत नाईक यांनी नियोजन आखले असून, त्याप्रमाणे ध्वजांचे वितरण केले जात आहे.
-------------
चौकट
आजरा नगरपंचायतीकडून नियोजन
आजरा शहरात चार हजारे कुटुंबे राहतात. त्यादृष्टीने नगरपंचायतीने नियोजन केले आहे. सध्या एक हजार ध्वज उपलब्ध झाले. सर्वांना ध्वज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील व प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85880 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..