भगिरथी संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगिरथी संस्था
भगिरथी संस्था

भगिरथी संस्था

sakal_logo
By

४२२८१ (रक्षाबंधनचा फोटो वापरणे)

बंदीजनांना राख्या बांधून
घडवले मायेचे दर्शन

कळंबा कारागृहात भागीरथी संस्थेतर्फे उपक्रम

कोल्हापूर, ता. १० ः कळत नकळतपणे झालेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना कारागृहाच्या चार भिंतींमध्ये जग बंदिस्त झाले. घरच्यांची वारंवार आठवण येते. अशा परिस्थितीत बंदीजनांना राख्या बांधून भागीरथी संस्थेच्या महिलांनी आपुलकी, माया आणि बहिणीचे प्रेम दिलं. या उपक्रमामुळे बंदीजनही भारावून गेले. त्याचप्रमाणे कारागृहातील महिला कैद्यांसाठी संस्थेतर्फे शिलाई मशिनही देण्यात आली.
कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेतर्फे महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. सण-समारंभाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना बळ दिले जाते. गुरुवारी होणाऱ्‍या रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर संस्थेतर्फे कळंबा जेलमधील बंदीजनांना राख्या बांधण्याचा उपक्रम आज पार पडला. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात भागीरथीच्या महिलांनी बंदीजनांना राख्या बांधल्या. कुटुंबापासून दूर असलेल्या बंदीजनांच्या डोळ्यांत यामुळे अश्रू तरळले होते. घरच्या वातावरणाचा भास झाल्याची प्रतिक्रिया जीवन वाघमारे या बंदीजनाने दिली. कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, तुरूंग अधिकारी योगेश पाटील, शैलजा वाघ, बालाजी गुरुजी, मिताली पाटील, अश्‍विनी वास्कर, शोभा कोळी, वैशाली भोसले यांच्यासह कारागृह पोलिस, बंदीजन आणि भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या.

चौकट
महिला कैद्यांसाठी संस्थेतर्फे शिलाई मशिन
दरम्यान, कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैद्यांसाठी संस्थेने दोन शिलाई मशिन दिली. भागीरथी संस्था अशा प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे संगीता खाडे यांनी सांगितले. रक्षाबंधन आणि महिला कैद्यांसाठी शिलाई मशिनचा उपक्रम बंदीजनांना विधायक प्रेरणा देणारा असल्याचे वरिष्ठ तुरूंग अधिकारी सतीश कदम यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85881 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..