आजरा तालुक्यातील शाळांतून एक राखी सैनिकासाठी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा तालुक्यातील शाळांतून एक राखी सैनिकासाठी उपक्रम
आजरा तालुक्यातील शाळांतून एक राखी सैनिकासाठी उपक्रम

आजरा तालुक्यातील शाळांतून एक राखी सैनिकासाठी उपक्रम

sakal_logo
By

42284
आजरा ः येथील आजरा हायस्कूलमध्ये एक राखी सैनिकांसाठी उपक्रमात संचालित केलेल्या राख्यांसह शिक्षिका व विद्यार्थिनी.


आजरा तालुक्यातील शाळांतून
एक राखी सैनिकासाठी उपक्रम
आजरा : तालुक्यात आजरा हायस्कूल व कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी यांच्यातर्फे एक राखी सैनिकासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी येसणे होते. विद्यार्थी व शिक्षकांनी सुमारे एक हजार राख्यांचे संकलन केले. देशांच्या सीमांचे संरक्षण जवान करीत असतात. त्यांच्या हाताना बळ देण्याबरोबर नैतिक बळ उंचावण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी उपमुख्याध्यापक बी. एम. दरी, पर्यवेक्षक एस. पी. होलम उपस्थित होते. कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी यांच्यातर्फे शंभर राखी विद्यार्थ्यांनी जमा केल्या. मुख्याध्यापक एस. एम. चव्हाण यांनी कोल्हापूर येथील मिलिटरी कॅम्पमध्ये अधिकाऱ्यांकडे राख्या सुपूर्द केल्या. प्रणिता शिपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला. संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, सचिव पांडुरंग शिपूरकर यांचे प्रोत्साहन लाभले. शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85888 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..