मोघम दिलेली नोटीस तात्‍काळ मागे घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोघम दिलेली नोटीस तात्‍काळ मागे घ्या
मोघम दिलेली नोटीस तात्‍काळ मागे घ्या

मोघम दिलेली नोटीस तात्‍काळ मागे घ्या

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद

६ ऑगस्ट पान ३ मेन कात्रण


मोघम दिलेली नोटीस मागे घ्या
प्रशासक चव्हाण यांचे ‘प्रदूषण नियंत्रण’ला पत्र; पंचगंगा नदीत मासे मृत्यू प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १० : पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी नियमांचा अभ्यास न करता, मोघमपणे व अधिकार नसताना दिलेली नोटीस मागे घ्यावी, असे पत्र जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्‍हा परिषदेने प्रदूषण नियंत्रणासाठी मंडळाकडे निधीची मागणी केली आहे. निधी मिळाला नसल्याने उपाययोजना रखडल्याचेही पत्रात नमूद आहे. मुळात चार महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले. त्याची विचारणा चार महिन्यांनी कशी होऊ शकते, असा सवाल करत प्रदूषण नियंत्रण मंडळावरच गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्‍हा परिषदेला प्रदूषणप्रकरणी नोटीस काढल्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. नदी प्रदूषण होऊन मासे मृत्यू होण्याचा प्रकार २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान घडला. त्याअनुषंगाने २६ जूनला मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. चार महिन्यांनी चौकशी करून नोटीस देणे, या प्रकारावरच संताप व्यक्‍त केला आहे. महत्त्वा‍चे म्‍हणजे ग्रामपंचायती या स्‍वायत्त संस्‍था असल्याने याप्रकरणी जिल्‍हा परिषदेला नोटीस देणे कसे अयोग्य आहे, हे दाखवून देत नोटीसच मागे घेण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली.
जिल्‍हा परिषदेने नदी प्रदूषण कमी करण्यासाठी नदीकाठच्या गावांचा प्रकल्‍प अहवाल केला आहे, मात्र ग्रामपंचायतींकडे निधी नाही. निधीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सहा वेळा पत्रव्यवहार केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यात प्रदूषण नियंत्रण मंडळच कसे दोषी आहे, हे दाखवून दिले. स्थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्या अधिकाराबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने त्यांनी माहिती घेण्याची सूचनाही पत्रात केली आहे.

मंडळाचीच कोंडी
प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिशीत २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान नदीत मासे मृत्युमुखी झाल्याचे म्‍हटले आहे. २६ जूनला महापालिका व प्रतिनिधींना सोबत घेऊन पाहणी केल्याचा उल्‍लेख आहे. जर फेब्रुवारीत मासे मृत्युमुखी पडले असतील तर जूनमध्ये पाहणी केलीच कशी? हे करण्यामागचे कारण काय? तसेच ही पाहणी करताना जिल्‍हा परिषद व महसूलचे प्रतिनिधी का घेतले नाहीत, अशी विचारणाही केली. नोटिशीतील अनेक विसंगतीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोट ठेवत मंडळाची कोंडी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85903 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..