मोटारसायकल चोरटे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारसायकल चोरटे जेरबंद
मोटारसायकल चोरटे जेरबंद

मोटारसायकल चोरटे जेरबंद

sakal_logo
By

४२३६१

रजपूतवाडीतील दोघे चोरटे जेरबंद
---
सात गुन्ह्यांची उकल; सव्वा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः दोन मोटारसायकल चोरट्यांना करवीर पोलिसांनी जेरबंद केले. हर्षवर्धन शरद सुतार (वय २०) आणि विशाल सुभाष फाळके (२२, रा. रजपूतवाडी, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. त्याच्याकडून सात गुन्ह्यांची उकल करून सव्वा लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी सांगितले, की गुन्हेशोध पथकाने वडणगे फाटा येथे नाकाबंदी केली होती. पन्हाळामार्गे विना नंबरप्लेट मोटारसायकलवरून दोघे येत होते. पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी त्याची नावे हर्षवर्धन सुतार आणि विशाल फाळके असल्याचे सांगितले. चौकशीत त्यांनी संबंधित मोटारसायकल तीन महिन्यांपूर्वी केर्ली (ता. करवीर) भागातून चोरल्याचे सांगितले. पथकाने त्यांना अटक केली. तपासात घरगुती पिठाच्या चक्कीसह महापालिका परिसर, कुशिरे, सांगली, मिरज अशा ठिकाणांहून सहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे, उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, अंमलदार सुजय दावणे, विजय तळसकर, बालाजी हांगे, योगेश शिंदे, अमोल चव्हाण आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85953 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..