शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचा प्रश्‍न सोडवूनच स्वस्थ बसू ः आमदार राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचा प्रश्‍न सोडवूनच स्वस्थ बसू ः आमदार राजेश पाटील
शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचा प्रश्‍न सोडवूनच स्वस्थ बसू ः आमदार राजेश पाटील

शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचा प्रश्‍न सोडवूनच स्वस्थ बसू ः आमदार राजेश पाटील

sakal_logo
By

42324
आजरा : येथील तहसीलदार कार्यालयात उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या बैठक प्रसंगी आमदार राजेश पाटील, जयवंतराव शिंपी, अश्विनी जिरंगे, वसुंधरा बारवे, विनया बदामी.

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न सोडवूनच स्‍वस्‍थ बसू
आमदार राजेश पाटील; आजरा तहसील कार्यालयात बैठक, सकारात्मक चर्चा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १०: उचंगी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासन व प्रकल्पग्रस्तांमध्ये समन्वय राखण्याचे काम केले आहे. गत तीन वर्षांत यासाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत. तुमचे प्रश्‍न हे आमचे प्रश्‍न आहेत. त्यामुळे शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.
येथील आजरा तहसीलदार कार्यालयात उचंगी प्रकल्पाबाबत आढावा बैठक झाली. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्‍विनी जिरंगे, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, दूधगंगा डावा कालवा विभागाच्या कार्यकारी अधिकारी विनया बदामी प्रमुख उपस्थित होत्या.
संजय तर्डेकर म्हणाले, ‘‘प्रकल्प पूर्ण झाला आहे. पण आजही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न शिल्लक आहेत. याबाबत प्रशासनाने आश्‍वासक पावले उचलण्याची गरज आहे. दीडशे घरांचे पैसे तातडीने मिळावेत. डाव्या व उजव्या तीरावरचा रस्ता पावसाळ्यात ग्रामस्थांना वापरण्याजोगा करून द्यावा. शालेय विद्यार्थी व रुग्ण यांची सोय करून मिळावी. हात्तीवडे जवळील बोलकेवाडी येथे जमीन मिळालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाच्या हद्दीतून साठ मीटरचा रस्ता करून मिळावा. सात लोकांची ६५ टक्के रक्कम भरून मिळावी. बुडीत क्षेत्रातील तोडण्यात आलेली विजेची जोडणी नवीन ठिकाणी तातडीने मिळावी. चाफवडे गावातील २२ घरांना प्रकल्पाच्या पाण्यामुळे धोका तयार झाला आहे. ती घरे संपादित करण्यात यावीत. पाणी वापर संस्था करण्यासाठी नियोजन करावे. प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी आमचा विरोध कायम राहणार आहे.’’ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, तहसीलदार विकास अहिर, संपत देसाई, माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी, उचंगीचे उपअभियंता विजयसिंह राठोड, मारुती चव्हाण, सुशील पाटील, धनाजी दळवी, एस. पी. कांबळे, अण्णासो पाटील यांसह प्रकल्पग्रस्तांनी चर्चेत सहभाग घेतला.
----------------
चौकट
प्रकल्पग्रस्त हेच खरे ‘उचंगीकार’
कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेणे मला नको आहे. खरे उचंगीकार हे चार गावांतील प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्या या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85956 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..