गणेशोत्सव मंडळांचा महापालिकेवर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव मंडळांचा महापालिकेवर मोर्चा
गणेशोत्सव मंडळांचा महापालिकेवर मोर्चा

गणेशोत्सव मंडळांचा महापालिकेवर मोर्चा

sakal_logo
By

ich104.jpg
42270
इचलकरंजी ः गणेश विसर्जन प्रश्नी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅलीद्वारे महापालिकेवर मोर्चा काढला. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------
गणेशोत्सव मंडळांचा महापालिकेवर मोर्चा
इचलकरंजी, ता. १० ः शहापूर खाणीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यास विरोध करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला. प्रशासक सुधाकर देशमुख यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबत प्रशासनाकडून अद्याप निर्णय झाला नसून, गणेशोत्सव मंडळाची बैठक घेऊन याप्रश्नी चर्चा करण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
तत्पूर्वी, शिवतीर्थ येथून मोटारसायकल रॅलीद्वारे महापालिकेवर मोर्चा काढला. प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी मोर्चा रोखला. त्यानंतर शिष्टमंडळाने श्री. देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. गजानन महाजन, अनिल डाळ्या, पुंडलिक जाधव, मलकारी लवटे, मोहन मालवणकर यांनी गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मंडळांची भूमिका मांडली. माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पै. अमृत भोसले, किसन शिंदे, अमरजित जाधव, नागेश पाटील, प्रमोद बचाटे आदी उपस्थित होते. दरम्यान, याप्रश्नी अखील भारतीय मराठा महासंघ, मनसेतर्फेही महापालिकेला निवेदन दिले. उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी निवेदन स्वीकारले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85985 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..