४६५ विकासकामांचे भवितव्य अधांतरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४६५ विकासकामांचे भवितव्य अधांतरी
४६५ विकासकामांचे भवितव्य अधांतरी

४६५ विकासकामांचे भवितव्य अधांतरी

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद

४६७ विकासकामांचे भवितव्य अधांतरी
काम रद्द करून ‘जशास तसे’ उत्तर; लोकप्रतिनिधी, कंत्राटदारांचा जीव टांगणीला
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १० : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्या दणक्यात विकासकामांसाठी दिलेला निधी; मात्र अद्यापही सुरू न झालेली कामे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यात जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य, बांधकाम व ग्रामपंचायतीकडील सुमारे १०० कोटींच्या ४६७ कामांचा समावेश आहे. अचानक कामांना ब्रेक लागल्याने कंत्राटदार व लोकप्रतिनिधींच्या पोटात गोळा आला आहे. सत्तेतून भाजप बाजूला गेल्यानंतर महाविकास आघाडीनेही पहिल्यांदा कामांना ब्रेक लावत नंतर अनेक कामे रद्द केली. त्यामुळे आताही जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी चर्चा रंगली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने महिनाभरात महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली विकासकामे रद्द करण्याचे निर्णय घेतले. यातून एकही विभाग सुटलेला नाही. जी कामे मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत, कामे मंजूर आहेत मात्र निविदा झालेली नाही, निविदा झाली मात्र कामाचे आदेश दिले नाहीत, कामाचे आदेश दिले तर काम सुरू नाही, अशा सर्व कामांना स्‍थगिती दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घाईगडबडीने सभा, बैठका घेण्याच्या सूचना देऊन, काही वेळा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामांना मंजुरी देण्याचा प्रयत्‍न केला. मात्र अखेरपर्यंत त्यात यश आले नाही. विविध टप्‍प्यावर ही कामे अडवली. त्यामुळे कंत्राटदार, लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
शासन निर्णय व परिपत्रकातून ही कामे स्‍थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेकांना कामांना पुन्‍हा मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक कंत्राटदारांनी मागील अनुभवाचे कथन करत सर्व कामे रद्द करण्याची मागणी लावून धरली. भाजप सत्तेतून पायउतार होताना, तेव्‍हा मंजूर केलेली कामे थांबवली. त्याहीपुढे जाऊन जी कामे सुरू होऊन त्यातील १० ते १५ टक्‍के काम झाले होते, अशी कामेही रद्द केल्याचे कंत्राटदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आताही तोच न्याय लावावा, अशी मागणी केली जात आहे.


....
विभाग कामांची संख्या रक्‍कम (कोटीत)
आरोग्य विभाग १२५ ३१.२
बांधकाम २५८ ५५.११
ग्रामपंचायत ८४ १३.८७

कोट
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी ठरवून भाजपच्या काळात मंजूर विकासकामे स्‍थगित केली. यातील अनेक कामे सुरू असताना ती अर्धवट थांबवली. नंतर रद्द केली. त्यामुळे आता कोणी कामे रद्द करण्यावरून टीकाटिप्‍पणी करू नये. अडीच वर्षांपूर्वी टीका करणाऱ्यांनी काय केले ते पाहावे. भाजप सत्तेत आल्यानंतर नवीन काही निर्णय घेत नाही. मागील निर्णयांची उजळणी सुरू आहे.
- राहुल देसाई, युवा नेते, भाजप

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85987 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..