Gag101_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag101_txt.txt
Gag101_txt.txt

Gag101_txt.txt

sakal_logo
By

42347

मुसळधारेने कोसळल्या
गगनबावड्यात भिंती
ऐन पावसाळ्यात संसार पडले उघड्यावर
गगनबावडा, ता. १० ः गगनबावडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने कित्येक घरांच्या भिंती कोसळून जबर नुकसान झाले. जवळजवळ नऊ घरांच्या अंशतः भिंती कोसळून, पत्रे उडून घरांचे, तसेच अन्नधान्य, प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर पडले.
गगनबावड्यामधील गंगाराम बाबू कोळेकर यांच्या घराची भिंत कोसळून २० हजारांचे नुकसान झाले. रेव्याचीवाडी येथील आक्काताई तुकाराम चौकेकर यांच्या घराची भिंत कोसळून पंधरा हजारांचे नुकसान झाले. येथील विनोद सदाशिव पांगळे यांच्या घराचे पत्रे उडून २० हजारांचे नुकसान झाले. साखरीतील तीन घरांचे, साळवणमधील एका घराचे, असंडोलीतील एका घराचे व शेळोशीतील एका घराचे असे मिळून दोन लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. शासनाकडून पंचनामे चालू आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85989 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..