विद्यार्थी विकास विभागाची विद्यार्थ्यांना ३ कोटी ७५ हजाराची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी विकास विभागाची विद्यार्थ्यांना ३ कोटी ७५ हजाराची मदत
विद्यार्थी विकास विभागाची विद्यार्थ्यांना ३ कोटी ७५ हजाराची मदत

विद्यार्थी विकास विभागाची विद्यार्थ्यांना ३ कोटी ७५ हजाराची मदत

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठ लोगो

विद्यार्थी कल्याण निधीचा ३१६ जणांना लाभ
३ कोटींवर मदत; पालक, कर्मचारी यांना मदतीचा आधार

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने कल्याण निधी योजनेचा लाभ ३१६ जणांना झाला. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांना सुमारे ३ कोटी ७५ हजारांची मदत दिली आहे. यातील बहुतांशी जणांनी कोरोनात आप्तजण गमावले आहेत. त्यामुळे विद्यार्थी कल्याण निधी हा विद्यापीठाशी संबंधित घटकांना मदतीचा आधार ठरला आहे.
विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी कल्याण निधी ही योजना राबवली जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शंभर रुपये घेतले जातात. तसेच शिक्षक, कर्मचारी यांच्याकडूनही निधी घेतला जातो. नैसर्गिक कारणांमुळे जर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पालकांना दीड लाखांची मदत केली जाते. जर विद्यार्थ्याच्या पालकाचे निधन झाले तर विद्यार्थ्याला ७५ हजारांची मदत केली जाते. जर विद्यार्थ्याचे दोन्ही पालकांचे निधन झाले तर त्या विद्यार्थ्याला दीड लाखाची मदत केली जाते. अशाच प्रकारची मदत शिक्षक आणि कर्मचारी यांनाही केली जाते.

२०२० ते २०२१ या कालावधीतील मदत
*विद्यार्थी, विद्यार्थिनी - १३
*पालक - ३२
*प्रशासकीय कर्मचारी - १२
*शिक्षक - २
*एकूण - ५९
*दिलेली रक्कम - ६६ लाख
----------
२०२१ ते २०२२ या कालावधीतील मदत
*विद्यार्थी, विद्यार्थिनी - २०
*पालक - २०१
*शिक्षक, कर्मचारी - ३६
-एकूण - २५७
दिलेली रक्कम - २ कोटी, ३४ लाख, ७५ हजार

विद्यार्थी विकास विभागाची कामगिरी
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने दोन वर्षात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. लवकरच विभागाचे स्वतंत्र ५०० बेडची क्षमता असणारे वसतिगृह, विभागाची स्वतंत्र इमारत, अडीचशे क्षमतेचे सभागृह अशा वास्तू उभ्या राहणार असून याचे आराखडे मंजूर आहेत. विभागाचे स्वतःचे ग्रंथालयही सुरू होत असून त्यासाठी पुस्तक खरेदीही झाली आहे.

विद्यार्थी विकास विभागाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या उपक्रमांतर्गत मोठे काम केले आहे. रांगोळी, वक्तृत्व आणि पोस्टर स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रबोधनाचे काम केले आहे. कल्याण निधीच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
- प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, संचालक, विद्यार्थी विकास विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86003 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..