आज रक्षाबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज रक्षाबंधन
आज रक्षाबंधन

आज रक्षाबंधन

sakal_logo
By

बहीण-भावाच्या नात्याला
मिळणार झळाळी
---
आज रक्षाबंधन; खरेदीसाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन सण उद्या (ता. ११) साजरा होणार असून, यानिमित्त शहरातील बाजारपेठ सजली आहे. रक्षाबंधनानिमित्त राखी तसेच बहिणीला देण्याकरिता गिफ्टची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
भावा-बहिणीतील स्नेह व परस्पर प्रेम वृद्ध‌िंगत करणाऱ्या या सणानिमित्त शहरातील बाजारगेट, पापाची तिकटी, महाद्वार रोड, राजारामपुरी या मुख्य बाजारपेठेसह उपनगरातही स्टॉल सजले होते. लाडक्या भावाच्या मनगटावर कोणती राखी छान दिसेल, याचा अंदाज बांधत बहिणींनी आज स्टॉलवर राखी खरेदीसाठी गर्दी केली. डायमंड वर्क, म्युझिकल, फॅन्सी, मोती, अमेरिकन डायमंड, भय्या-भाभी, मल्टिकलर लेसेस, कार्टुन्स अशा विविध प्रकारच्या राख्या अगदी दोन रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत मिळत होत्या. ग्राहकांची सर्वांत जास्त पसंती ही मोती, स्टोन, मल्टिकलर लेसेस, डायमंड वर्क, कपल राखी अशा डिझाइन राख्यांसह सिल्व्हर कॉईन असलेल्या रक्षाबंधनाच्या सेटला होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत राखीच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ झाली असली तरी बाजारपेठेत खरेदीसाठी उत्साह होता.
-------
पोस्ट, कुरियर कार्यालयात गर्दी
बाहेरगावी राहणाऱ्या भावाला राखी पाठविण्यासाठी आज दिवसभर टपाल व कुरियर कार्यालयांत गर्दी पाहायला मिळाली. एका दिवसात राखी पोचेल का? असा प्रश्न विचारत बहिणींनी गडबडीने राखी टपाल व कुरियर कार्यालयांतून भावाला पाठवली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86049 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..