देखाव्यांतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखाव्यांतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
देखाव्यांतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

देखाव्यांतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

sakal_logo
By

लोगो येई गणेशा.. लोगो

42390
देखाव्यांतून यंदा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन
गणेशोत्सवात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव; दोन वर्षांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ बहरले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही साजरा होणार आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी देखाव्याच्या रेकॉर्डिंगसाठी रेकॉर्डिंग स्टुडिओ बहरले असून, यानिमित्ताने कलाकारांसाठीही रोजगार उपलब्ध झाला आहे. यंदाच्या देखाव्यांत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटना, घडामोडींवर आधारित देखाव्यांचा अधिक समावेश राहणार आहे. त्यादृष्टीने लेखनाबरोबरच रेकॉर्डिंगसाठी मागणी वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात यंदाही पौराणिक देखाव्यांना मागणी आहे.
शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठेसह कसबा बावडा आदी परिसरात सजीव देखाव्यांची परंपरा आहे. दोन वर्षे गणेशोत्सवातील गर्दीवर निर्बंध असल्याने देखावे सादर झाले नाहीत. मात्र, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव साजरा होणार असून, मंडळांची देखाव्यांची तयारी सुरू झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात शहराने दिलेल्या योगदानावर आधारित देखावे बहुतांश मंडळे सादर करणार आहेत. त्याशिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रश्नांचा वेध घेणारे प्रबोधनात्मक देखावेही असतील. ग्रामीण भागात अर्धा तास ते एक तासापर्यंतचे देखावे सादर करण्याची परंपरा अजूनही काही गावांनी जपली आहे. ही मंडळे यंदाही ऐतिहासिक, पौराणिक विषयावरच देखावे सादर करणार आहेत. त्याशिवाय विनोदी देखाव्यांनाही मागणी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर रेकॉर्डिंग स्टुडिओही सज्ज झाले आहेत.

कोट
यंदाच्या गणेशोत्सवात स्वातंत्र्यलढ्यावर आधारित देखाव्यांना मागणी आहे. शहरातील मंडळे शहरातील काही घटनांवर देखावे सादर करणार असून, त्याच्या लेखनाला प्रारंभ झाला आहे. १० मिनिटांपासून ते एक तासापर्यंतचे देखावे यंदाही पाहाता येतील. त्यादृष्टीनेच रेकॉर्डिंगसाठी आत्तापासूनच नोंदणी होऊ लागली आहे. दोन दिवसांत सहा देखाव्यांच्या रेकॉर्डिंगचे काम सुरू झाले आहे.
- मकरंद लिंगनूरकर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86059 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..