इचल: ठेविदारांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: ठेविदारांना दिलासा
इचल: ठेविदारांना दिलासा

इचल: ठेविदारांना दिलासा

sakal_logo
By

नूतन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
प्रशासक प्रेमदास राठोड; पाच लाखांपर्यंतच्या ठेवी खात्यावर वर्ग
इचलकरंजी, ता. १० ः येथील शंकरराव पुजारी नूतन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. बँकेच्या ४०९२ ठेवीदारांचा ‘डीआयसीजी’कडून क्लेम मंजूर झाला आहे. त्यानुसार संबंधित बँक खात्यावर एकूण ४१ कोटी ६० लाख रक्कम जमा झाली आहे. याबाबतची माहिती बँकेचे प्रशासक प्रेमदास राठोड यांनी पत्रकारांना दिली.
बँकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने १३ मेपासून निर्बंध लागू केले होते. बँकेवर शिरोळचे सहाय्यक निबंधक श्री. राठोड यांची प्रशासकपदी नियुक्ती केली होती. त्यांनी पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. याबाबत त्यांनी डीआयसीजीकडे क्लेम दाखल करण्याबाबत ठेवीदारांना आवाहन केले होते. त्यानुसार ४६१० ठेवीदारांचे ४५ कोटी ७८ लाखांचे क्लेमचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी ४०९२ क्लेम मंजूर केले आहेत. त्यांच्या संबंधित बँक खात्यावर एकूण ४१ कोटी ६० हजार इतकी रक्कम जमा झाली आहे.
बँकेकडे एकूण १५४०३ इतके छोटे-मोठे खातेदार व ठेवीदार आहेत. त्यांची एकूण क्लेमची रक्कम ५३ कोटी ११ लाख आहे. अद्याप १०७९४ ठेवीदारांची ७ कोटी ३२ लाखांचे क्लेम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील टप्प्यांत संबंधित ठेवीदारांचा क्लेम मंजूर होईल, असे श्री. राठोड यांनी सांगितले. अत्यंत कमी कालावधीत क्लेम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठेवी परत मिळाल्यामुळे संबंधित ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. बँकेतील कर्मचारी वर्गाचेही मोठे सहकार्य मिळाले असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. बँकेचे अधिकारी दीपक आरगे, कमल तेली, मारुती अनुसे, मलकारी लवटे, उमेश पाटील, राजेंद्र वडेर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86066 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..