टपाल आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टपाल आंदोलन
टपाल आंदोलन

टपाल आंदोलन

sakal_logo
By

टपाल खात्याचे खासगीकरण करू नये
जिल्ह्यातील कामकाज ठप्प; जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः टपाल खात्याचे विलीनीकरण व खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा यांसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप केला. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज ठप्प झाले.
कर्मचारी संघटनेने दिलेली माहिती अशी, केंद्र सरकारचा टपाल खात्याच खासगीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. कामगार कायद्यातील बदलत्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. टपाल खाते तोट्यात असल्याचे दाखवून कमी मनुष्यबळ असलेल्या टपाल विभागातील कर्मचाऱ्यांवर वाढीव उद्दिष्ट दिले जात आहेत. कामाचा बोजा वाढवला आहे. या सर्वातून कर्मचाऱ्यांचे शोषण होत आहे. टपाल विभागाचे खासगीकरणचा सरकारने घाट घातला आहे, तो रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संप पुकारला आहे. यातूनही खासगीकरण रद्द झाले नाही तर भविष्यात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

मागण्या अशा
रिक्त जागा तातडीने भराव्यात
पदांची पुनर्रचना करावी
कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांना वारसांना दहा लाख
कोरोना काळात १८ महिने रोखलेला महागाई भत्ता
वेतनवाढीसाठी घातलेल्या अटींत सुधारणा
उद्दिष्ट गाठण्यासाठी सुटीदिवशी कामावर बोलवणे थांबवावे
पाच दिवसांचा कामकाज आठवडा लागू करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86086 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..