कृष्णा योजना जलवाहिनी बदलाच्या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ः आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृष्णा योजना जलवाहिनी बदलाच्या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ः आवाडे
कृष्णा योजना जलवाहिनी बदलाच्या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ः आवाडे

कृष्णा योजना जलवाहिनी बदलाच्या मागणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष ः आवाडे

sakal_logo
By

लोगो- कृष्णा योजना

जलवाहिनी बदलाच्या मागणीकडे
महापालिकेचे दुर्लक्ष ः आवाडे

इचलकरंजी, ता. ११ ः थकीत सहायक अनुदानापोटी राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या ९८ कोटींमधून अतिरिक्त शिल्लक रकमेतून कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलासाठी मागणी केली होती. पण, महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ काही जणांच्या हस्तक्षेपामुळे हा निधी चांगल्या कामाऐवजी केवळ मक्तेदारांची बिले काढण्यासाठी खर्ची घातला जातो, असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला.
राज्य शासनाकडून पालिकेला काही महिन्यांपूर्वी सहायक अनुदानातील थकीत रकमेपोटी ९८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्या रकमेतून कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांची देयके, मेडिकल बिले, प्रॉव्हिडंड फंडासह देण्यात आली. त्यातून बरीचशी रक्कम शिल्लक राहिली. त्यातूनही कर्मचाऱ्‍यांची उर्वरित देणी भागविण्यास कोणाचाच विरोध असण्याचे कारण नव्हते. पण, त्यानंतर शिल्लक रकमेतून शहराचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न व्हावा, या उद्देशाने तत्कालीन मुख्याधिकारी आणि महापालिकेचे विद्यमान उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना पत्र पाठविले होते. कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या उर्वरित जलवाहिनी बदलण्याबाबत प्रस्ताव तयार करून द्यावा. त्यासाठी निधी खर्च करण्याबाबत राज्य शासनाकडून आपण मंजुरी आणून देऊ, असे पत्राद्वारे कळविले होते. परंतु, प्रशासनाकडून पाणी प्रश्‍नाला गांभीर्य न देता अन्य गोष्टीत रस असल्याचे दिसत असल्याची टीका आमदार आवाडे यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86108 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..