रस्ते दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते दुरुस्तीची मागणी
रस्ते दुरुस्तीची मागणी

रस्ते दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

रस्ते दुरुस्तीची मागणी
इचलकरंजी ः गणेश विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्तीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांना ई-मेलद्वारे दिले आहे. दोन वर्षांपासून कोरोना, महापुरामुळे अनेक सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यासाठी शासनाने निर्बंध घातले होते. पण, आता हे निर्बंध शिथिल केले आहेत. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. गणेशाचे स्वागत व विसर्जन मिरवणुकीवेळी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यात मिरवणूक मार्ग असलेल्या रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजविणे गरजेचे आहे. याशिवाय मिरवणूक मार्गावरील पथदिव्यांची व्यवस्था करणे, वेळेत कचरा उचलणे अशा उपाययोजना करण्याबाबत तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही करावी, असे श्री. पोवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86116 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..