पंचगंगा प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करा
पंचगंगा प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करा

पंचगंगा प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करा

sakal_logo
By

पंचगंगा प्रदूषित न करता गणेशोत्सव साजरा करा
शशांक बावचकर यांची भूमिका; तरुणांना चुकीच्या दिशेने न नेण्याचे आवाहन
इचलकरंजी, ता.११ ः शहरातील मुख्य विसर्जन मार्गावर स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देऊनही गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खाणीमध्ये करता
येऊ शकते. त्यामुळे पंचगंगा नदीचे पात्रही स्वच्छ राहील व सणही उत्साहात साजरा करता येईल. त्यामुळे राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सवंग लोकप्रियतेसाठी तरुणांना चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न थांबवावा. पंचगंगा नदी प्रदूषित न करता गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी मांडली आहे.
श्री. बावचकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सर्वच धर्मातील उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी दोन वर्षे असलेले काही निर्बंध हटवण्याचे जाहीर केले. तथापि, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक तत्त्वे याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात काही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करणार व त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांची परवानगी आणणार, अशा आशयाचे निवेदन जाहीर केले आहे.’
इचलकरंजीमध्ये २०१६ पासून गणेश मूर्तीचे विसर्जन शहापूरच्या खाणीमध्ये करण्यास सुरुवात झाली होती. यावर्षी १४ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खाणीमध्ये झाले होते. दोन वर्षांत १०० टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खणीमध्ये झाले होते. त्यामुळे इचलकरंजीची जीवनदायींनी असणारी पंचगंगा नदी पात्र हे निर्मळ राहिले होते. असे असताना माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे काही समर्थक व स्वतः आमदार प्रकाश आवाडे यांनी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याची भूमिका घेतलेली आहे.’
आमदार आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी ‘पंचगंगा नमोस्तुते’ हा कार्यक्रम राबवून शहरामध्ये विविध ठिकाणी या विषयावर पथनाट्य सादर केले होते, असे असताना त्यांनी स्वतःची भूमिका बदलण्याचे नेमके कारण काय, सवंग लोकप्रियतेसाठी शहरातील तरुणांना वेगळ्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न नव्हे काय, अशा संतप्त भावना श्री. बावचकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86125 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..