टाकवडेत लोकसहभागातून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकवडेत लोकसहभागातून स्वच्छता
टाकवडेत लोकसहभागातून स्वच्छता

टाकवडेत लोकसहभागातून स्वच्छता

sakal_logo
By

42420
टाकवडेत लोकसहभागातून स्वच्छता
इचलकरंजी : टाकवडे (ता. शिरोळ) येथे लोकसहभागातून गावात ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्वच्छता फेरीचे आयोजन करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करण्यात आली. मोहिमेत गावातील विद्यार्थी, तरुण मंडळे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. गावाला जोडणारे मार्ग, विविध चौकांत कचरा, झाडे झुडपे यांचा बंदोबस्त करत स्वच्छता करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ग्रामस्वच्छतेत गावाने पहिल्यांदाच गावासाठी एकत्र येत विधायक काम केले.
---------
42421
डीकेएएससी महाविद्यालयात कार्यक्रम
इचलकरंजी : शिक्षणामुळे राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. तसेच आधुनिक शिक्षणामुळे एकीची भावना निर्माण झाली आहे. सामूहिक हितासाठी स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी सहभाग घेतला. यापुढे स्वतंत्र भारताच्या विकासात सर्वच घटकांचे योगदान अमूल्य असल्याचे मत डॉ. ए. पी. जाधव यांनी व्यक्त केले. डीकेएएससी महाविद्यालयात आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. डी. सी. कांबळे होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. आभार प्रा. ए. एस. कटकोळे यांनी मानले. यावेळी डॉ. डी. जी. घोडके, डॉ. एस. जे. वेल्हाळ, प्रा. टी. एस. हराळे, प्रा. बेंद्रे, प्रा. विशाल कांबळे, प्रा. रॉड्रिक्स उपस्थित होते.
--------
42422
‘व्यंकटेश’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. स्वराज्य महोत्सवाअंतर्गत महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी व्याख्यान, गायन, नृत्य सादर केले. पुष्पा पाटील, अर्पिता खोत, संस्कृती पाटील आदी विद्यार्थिनींनी कला सादर केल्या. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने होते. प्रास्ताविक डॉ. एस. एच. आंबवडे यांनी केले. आभार डॉ. डी. एस. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. कांबळे व प्रा. अमिन बाणदार यांनी केले.
--------
42423
कन्या महाविद्यालयात एनसीसी भरती
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात एनसीसी भरती झाली. एनसीसीच्या प्रथम वर्षाच्या भरतीसाठी ३३ जागांसाठी ९२ अर्ज आले होते. अर्जांची छाननी तसेच भरती प्रक्रिया करून ३३ छात्रसैनिकांची भरती केली. पुशप्स, सिटप्स, ८०० मीटर धावणे अशी प्रक्रिया घेण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कर्नल एस. गणपती, सुभेदार मेजर राजाराम वारंग, कॅप्टन प्रा. प्रमिला सुर्वे, हवालदार अलगू राजन, श्री. बळवंत यांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली. प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेचे आयोजन केले होते.
-----------
42424
इचलकरंजी हायस्कूलचे यश
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूलने जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत यश मिळवले. कोल्हापूर जिल्हा रस्सीखेच संघटना व राज्य रस्सीखेच संघटना यांच्या मान्यतेने कोल्हापूर येथील शिवाजी स्टेडियम येथे १६ ते १७ वयोगटांतर्गत मुला-मुलींच्या रस्सीखेच स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. १३ वर्षे गट मुले- वेदांत लायकर, प्रणव चव्हाण, जगदीश चव्हाण, सवंत पाटील. मुली- प्रांजली शेटाणे, अनुष्का हावळ, पूर्वा माने. १५ वर्षांखालील मुलींमध्ये अक्षरा पाटील, श्रेया रूग्गे या खेळाडूंनी यश मिळविले. सर्व खेळाडूंची १५ ते १८ ऑगस्टदरम्यान शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना प्रशिक्षक शुभम मठपती, सलोनी आरेकर, अक्षय पाटील, क्रीडाप्रमुख व्ही. एस. गुरव, डी. वाय. कांबळे, सुहास पवळे, बी. एम. थोरवत आदींचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका सौ. व्ही. एच. उपाध्ये, पर्यवेक्षक यु. पी. पाटील यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
------------------
श्रमिक महासंघातर्फे व्याख्यान
इचलकरंजी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येथील महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ शाखेतर्फे व्याख्यानाचे आयोजन केले आहे. समाजवादी प्रबोधिनी सभागृहात भारतीय स्वातंत्र्य लढा व संविधान या विषयावर प्रसाद कुलकर्णी हे बोलणार आहेत. शनिवारी (ता. १३) सायंकाळी सहा वाजता या व्याख्यानाचा लाभ शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्रमिक महासंघातर्फे केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86142 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..