खोतवाडीत उभारणार ७५ फुट उंच ध्वजस्तंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोतवाडीत उभारणार ७५ फुट उंच ध्वजस्तंभ
खोतवाडीत उभारणार ७५ फुट उंच ध्वजस्तंभ

खोतवाडीत उभारणार ७५ फुट उंच ध्वजस्तंभ

sakal_logo
By

42445
-------

खोतवाडीत उभारणार
७५ फूट उंच ध्वजस्तंभ
इचलकरंजी, ता. ११ : खोतवाडी येथील गजानन महाराज मंदिर परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. ७५ फूट उंचीवरील या ध्वज स्तंभावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. ज्या लेखणीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली, त्या लेखणीचे प्रतीक म्हणून या ध्वजस्तंभाला लेखणीचा आकार दिला आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी दहाला हिरवाईने नटलेल्या या परिसरात या स्तंभावर आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. इचलकरंजीनजीक खोतवाडी येथे श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरात २१ फूट उंच भारतमातेची मूर्ती, शक्तिपीठ, भक्तिपीठाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगद्‌गुरू शंकराचार्य आदींच्या मूर्ती साकारल्या आहेत. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त मूर्तीशेजारी ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. ध्वजस्तंभाला लेखणीचा आकार दिला असून, स्तंभावर नऊ फूट लांब आणि सहा फूट रुंद ध्वज अभिमानाने फडकणार आहे. कोल्हापूरमध्ये देशातील सर्वांत उंच दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंच ध्वजस्तंभ उभारला होता. त्यानंतर इचलकरंजी परिसरात हा सर्वांत उंच ध्वजस्तंभ असणार आहे, अशी माहिती गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष दिलीप शेंडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86156 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..