गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

सायकल क्लबतर्फे
गडहिंग्लजला उद्या रॅली
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज सायकल क्लबतर्फे शनिवारी (ता. १३) तिरंगा सायकल रॅली काढली जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी आठला म. दु. श्रेष्ठी विद्यालयापासून तिरंगा सायकल रॅलीला सुरवात होईल. या रॅलीत साधना हायस्कूल, जागृती हायस्कूल, विवेकानंद हायस्कूल, घाळी महाविद्यालय, शिवराज महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. युनिव्हर्सल फ्रेंडस् सर्कल, लायन्स क्लब गडहिंग्लज रॉयल, हिरण्यकेशी फाउंडेशन, राज सायकल मार्टचे सहकार्य मिळाले आहे. इच्छुकांनी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
नरेंद्र फौंडेशनतर्फे एक हजार ध्वज
गडहिंग्लज : येथील नरेंद्र फौंडेशनतर्फे हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमध्ये एक हजार कुटुंबांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. ध्वज कसा फडकवावा, ध्वज फडकवताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीही करण्यात आली. नेहरू चौकापासून ध्वज वितरणाची सुरवात करण्यात आली. भारत माता की जय... च्या घोषणेने परिसर दणाणला. यावेळी राजशेखर यरटे, प्रकाश मुजुमदार, बसवराज आजरी, सुनील हत्ती, श्रीनिवास वेर्णेकर, प्रकाश तेलवेकर, योगेश शहा, नरेंद्र भद्रापूर, सिकंदर जमादार, अरुण दिवेकर, सुरेश भमान्नगोळ, प्रशांत हिरेमठ, सदाशिव रिंगणे, तम्मा बोरगावे, शिशकांत कोड्ड उपस्थित होते.
---------------
‘घाळी’तर्फे रविवारी सन्मान सोहळा
गडहिंग्लज : येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे अमृतमहोत्सवी वर्षपूर्ती झालेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. रविवारी (ता. १४) सायंकाळी चारला घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. डॉ. घाळी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान होईल. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी अध्यक्षस्थानी असतील. कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
नडगदल्ली मंचतर्फे दहीहंडीनिमित्त कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील कै. राजू नडगदल्ली मंचतर्फे दहीहंडी बांधली जाणार आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संकेश्‍वर मार्गावरील बसवेश्‍वर खानावळजवळ सायंकाळी चारला हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात १० गरीब महिलांना प्रत्येकी पाच किलो साखर वाटप, २५ गरीब महिलांना साडी वाटप, पाच गरीब पुरुषांना ड्रेस वाटप, दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दोन माजी सैनिकांसह आदर्श शिक्षिका, आदर्श सरपंच, एड्स निर्मूलनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
42508
अत्याळ : महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करताना प्रा. रमेश पाटील. शेजारी एन. एल. कांबळे, एम. ए. पाटील.

अत्याळला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. रमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक एन. एल. कांबळे यांनी स्वागत केले. टी. एन. पालकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सीया पाटील, प्रज्ञा कसाळे, स्नेहल चव्हाण, श्‍वेता मळगेकर, तनुजा पाटील, रेश्मा गाडीवड्ड, संचिता मगदूम, समृद्धी कसाळे या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार झाला. बीएड पदवी मिळविल्याबद्दल जगदीश गावीत यांचाही विशेष सत्कार झाला. प्रा. पाटील यांनी गुणवंतांनी इतरांना गुणवान बनविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. एम. ए. पाटील यांच्यासह तनुजा मोहिते, सायली मगदूम, श्रेया कसाळे या विद्यार्थिनींचीही भाषणे झाली. माधुरी अडसुळे यांनी सूत्रसंचालन केले. नीलम जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86220 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..