सप्टेंबरअखेरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सप्टेंबरअखेरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावू
सप्टेंबरअखेरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावू

सप्टेंबरअखेरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावू

sakal_logo
By

सप्टेंबरअखेरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावू
पुनर्वसन अधिकाऱ्यांची ग्वाही; आजऱ्यात सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ : सप्टेंबरअखेरपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही जिल्हा पुनर्वसन अधिकार अश्‍विनी जिरंगे यांनी दिली. पारपोली, गावठाण गावातील घरांच्या संपादनाबरोबरच जमीन वाटपासह इतर प्रश्‍न मार्गी लावण्याचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सर्फनाला प्रकल्पग्रस्तांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. या वेळी विविध मुद्यावर सकारात्मक चर्चा झाली. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, ‘श्रमुद’चे राज्य कार्याध्यक्ष संपत देसाई यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, अधिकारी या वेळी उपस्थित होते.
पारपोली-गावठाणमधील घरांचे संपादन लवकर पुर्ण करून पावसाळ्यानंतर लगेच निवाडा जाहीर केला जाईल. घरांच्या संपादन रक्कमेचे वाटप करण्यात येईल. ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी व भुखंडाची मागणी केली आहे. त्यांना सप्टेंबरअखेर जमीन वाटपाचे आदेश देवून पावसाळा संपताच जमिनीचा ताबा दिला जाईल. लाभक्षेत्रात वाटप झालेल्या चढ उताराच्या जमिनीचे सपाटीकरण व खडकाळ जमिनीवर माती टाकून त्या कसण्या योग्य केल्या जातील. पारपोली येथील गायरान जमीनी संपादित केल्या असून त्याचे सपाटीकरण करून जमिनीचे प्लॉटिंग केले जाईल. त्यांनंतर वाटप केले जाईल. पारपोली आणि गावठाण ही गावे विस्थापित होवून पुनर्वसित होत असल्याने खेडगे गावाला स्वतंत्र महसुल गावचा दर्जा दिला जाईल. त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवला जाईल. गट नं. १२५ मधील खातेदारांना स्वतंत्र त्यांच्या क्षेत्राप्रमाणे संपादानाची रक्कम दिली जाईल. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाकडून माहीती घेवून कार्यवाही करण्यात येईल. यासह सार्वजनिक व अनेक वैयक्तिक प्रश्‍नावर चर्चा होवून त्याचा अंमलबजावणीसाठी कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे ठरले.
या वेळी तहसीलदार विकास अहिर, उपअभियंता एस. वाय. पाटील, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अमरसिंह ढोकरे, तुकाराम गुंजाळ, श्रावण पवार, धोंडीबा सावंत, वसंत राणे, एकनाथ गुंजाळ, गोविंद पाटील, महादेव पाटील, मारुती ढोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86312 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..