तिरंग्यासह फोटो पाठवा - जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंग्यासह फोटो पाठवा - जिल्हाधिकारी
तिरंग्यासह फोटो पाठवा - जिल्हाधिकारी

तिरंग्यासह फोटो पाठवा - जिल्हाधिकारी

sakal_logo
By

तिरंग्यासह सेल्फी
पोर्टलवर पाठवा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत शनिवारी (ता. १३) ते सोमवारी (ता. १५) कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमांतर्गत https://harghartiranga.com/ या पोर्टलवर PIN A FLAG व UPLOAD SELFIE WITH FLAG - येथे क्लिक करून तिरंग्यासह फोटो (सेल्फी) अपलोड करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अवगत करावे व जिल्ह्यातून तिरंग्यासह जास्तीत जास्त सेल्फी, फोटो अपलोड होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या आहेत. याबाबतची बैठक आज त्यांनी घेतली.
घरोघरी तिरंगा कार्यक्रमात १३ ते १५ ऑगस्ट २०२२ हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांनी दररोज सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरविणे आवश्यक आहे. ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याची दक्षता घ्यावी. तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. काही गावे, शहर या ठिकाणी घरे, इमारती, कार्यालये, दुकाने यांचे तिरंगा लावल्यानंतरचे फोटो व व्हिडिओ ड्रोन शूटिंगने घेऊन त्याचे फोटो व व्हिडिओ पाठविण्यात यावेत. अशाही सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86335 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..