शासकीय कर्मचाऱ्यांची चेतना दिनानिमित्त निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कर्मचाऱ्यांची चेतना दिनानिमित्त निदर्शने
शासकीय कर्मचाऱ्यांची चेतना दिनानिमित्त निदर्शने

शासकीय कर्मचाऱ्यांची चेतना दिनानिमित्त निदर्शने

sakal_logo
By

शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने
विविध मागण्या ; चेतना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा 

सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर,ता.११ :  शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ‘चेतना दिवस'' पाळला.  आरोग्य खाते, शासकीय तंत्रनिकेतन, राजाराम कॉलेज, शिक्षण खाते, पाटबंधारे तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, कृषि खाते, महसूल खाते, शासकीय मुद्रणालय, वस्तू व सेवा कर विभाग आदी कार्यालयात मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक र.ग. कर्णिक यांच्या प्रतिमेला वंदन करून ‘प्रतिज्ञा घेतली. जुनी पेन्शन योजना रद्द  करा, अनुकंपा भरती सुरु करा, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, अशा घोषणा दिल्या. 
केंद्रीय दराने महागाई भत्ता मिळावा व सरकारी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेकडे वर्गीकरण करू नये, यासाठी ११ ऑगस्ट १९६६  ला  एक दिवसाचे "सामुदायिक रजा" आंदोलन  केंद्रीय मध्यवर्ती कर्मचारी  संघटनेने  केले होते. महाराष्ट्रात हे प्रथमच घडत असल्याने  शासनाने याविरोधात दंडनीतीचा अवलंब केला होता. आणि कर्मचारी संघटनाच्या मान्यता रद्द करण्यात येतील, अशी धमकी दिली. मुंबई  पोलिस आयुक्तांनी   सचिवालय परिसरात जमावबंदी केली. तरीही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांनी "सामुदायिक रजा आंदोलन  यशस्वी  केले होते. आंदोलनानंतर मध्यवर्ती संघटनेबरोबर चर्चा करून शासनाने मागण्या मान्य केल्या. या सामुदायिक रजा आंदोलनाच्या यशामुळे कर्मचाऱ्यांची एकजूट अधिक भक्कम झाली व मध्यवर्ती संघटनेची वाटचाल सुरू झाली. या लढयाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी ११ ऑगस्ट हा दिवस चेतना दिन म्हणून पाळण्याचा निर्णय मध्यवर्ती संघटनेने घेतला.
आजच्या आंदोलनात राज्य संघटक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, सुनील देसाई, विलास कुरणे, प्रकाश पाटील, दत्त सुतार, सुधाकर भांदिगरे, उदय लांबोरे सुदाम पाटील, ए.पी कांबळे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86338 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..