हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महापालिका रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महापालिका रॅली
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महापालिका रॅली

हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत महापालिका रॅली

sakal_logo
By

४२६०६

‘हर घर तिरंगा’साठी जनजागृती रॅली
महापालिकेतर्फे आयोजन ; शाळा, महाविद्यालयांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत व स्वराज्य महोत्सव उपक्रमाअंतर्गत यशवतंराव चव्हाण (केएमसी) कॉलेज व महापालिकेच्या शाळेतर्फे शहरात विविध ठिकाणी जनजागृती रॅली काढली. या माध्यमातून नागरिकांना घरात राष्ट्रध्वज उभारण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या रॅलीत यशवतंराव चव्हाण (केएमसी) कॉलेजतर्फे सकाळी ९ वाजता महाविद्यालयातून रॅली काढली. ही रॅली दुधाळी मैदानमार्गे उत्तरेश्वर पेठ परिसरातून शुक्रवार पेठ गंगावेश व शाहू समाधी स्थळ या मार्गावरून गेली. रॅली दरम्यान कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व एनसीसी विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन ‘हर घर तिरंगा‘, ‘वंदे मातरम'', ‘भारत माता की जय'' अशा घोषणा देत नागरीकांत जनजागृती केली. यानंतर कॉलेजमध्ये राष्ट्रीय प्रतिके व आचार सहिता या विषयावर प्रा.आर.व्ही.कोळेकर यांनी व्याख्यान दिले. वृक्ष दत्तक योजनेअंतर्गत १० विद्यार्थ्यांना वृक्ष दिले.कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्था संचलित शाहू दयानंद हायस्कूल, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, आर्य समाज बाल मंदिरातर्फे विद्यार्थी व शिक्षकानी मिळून मंडलिक वसाहत या भागातून ‘घर घर तिरंगा‘ जनजागृती रॅली काढली. डॉ.सर्वपल्ली राधकृष्णन् विद्या मंदिरातर्फे प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86346 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..