दक्षता समितीकडील प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा ः जिल्हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षता समितीकडील प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा ः जिल्हाधिकारी
दक्षता समितीकडील प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा ः जिल्हाधिकारी

दक्षता समितीकडील प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा ः जिल्हाधिकारी

sakal_logo
By

दक्षता समितीकडील
प्रकरणे निकाली काढा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीकडे प्राप्त प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याची सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रकरणामध्ये जातीचा दाखला, वैद्यकीय दाखला अथवा इतर कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. पोलिस विभाग व समाजकल्याण विभागाने एकत्रित आढावा घेऊन प्रकरणे तत्काळ समितीसमोर मंजुरीसाठी ठेवावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. बैठकीत प्रलंबित प्रकरणे तसेच पोलिस तपासावर प्रलंबित प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर दिलेल्या अर्थसाहाय्याचा आढावा घेतला. अनुसूचित जाती-जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या व कागदपत्र परिपूर्ण असणाऱ्या वीस प्रकरणांचा तसेच कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेतला. बैठकीमध्ये २० प्रकरणांना मंजुरी दिली. प्रलंबित प्रकरणांचा तपशील समिती समोर सादर करावा, अशा सूचना रेखावार यांनी दिल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विविध प्रकरणांची पोलिस तपासाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे यांनी प्राप्त प्रकरणांबाबत समितीसमोर माहिती सादर केली. बैठकीला जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, समाज कल्याण विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त सचिन साळे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86357 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..