आजरा ः वन्यप्राण्याच्या हल्यात बकरी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः वन्यप्राण्याच्या हल्यात बकरी ठार
आजरा ः वन्यप्राण्याच्या हल्यात बकरी ठार

आजरा ः वन्यप्राण्याच्या हल्यात बकरी ठार

sakal_logo
By

आवंडीत वन्यप्राण्याचा
गोठ्यात घुसून हल्ला
---
दोन ठिकाणी ११ बकऱ्यांचा पाडला फडशा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ ः आवंडी (ता. आजरा) येथे वन्यप्राण्याने गोठ्यात घुसून हल्ला केल्याने ११ बकऱ्या ठार झाल्या. आवंडी धनगरवाडा दोन व तीन या दोन वेगवेगळ्या ठिकाणी आज दुपारी घटना घडल्या आहेत. दिवसा ढवळ्या घटना घडल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. बकऱ्यांच्याबरोबर एका कुत्र्यालाही जीव गमवावा लागला आहे.
चित्री प्रकल्पापासून चार किलोमीटर अंतरावर आवंडीचे धनगरवाडे आहेत. आवंडी दोन व तीन हे धनगरवाडे अगदी जंगलात आहेत. धनगरवाड्यावर आज दुपारी वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्यात ११ बकरी ठार झाली. धनगरवाडा क्रमांक दोन वर जानबा विठू गावडे यांच्या गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या. आज दुपारी ते शेतात गेले होते. घरी परतल्यावर गोठ्यात पाच बकरी निपचित पडल्याचे दिसले. त्यांना वन्यप्राण्याने मानेजवळ जखमा आढळल्या आहेत. वन्यप्राण्यांने त्यांच्यावर हल्ला केल्याचे दिसून आले. दरमान्य वाडा क्रमांक तीन वरदेखील काही बकऱ्या वन्यपाण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. पशुसंवर्धन अधिकारी पी. डी. ढेकळे यांनी भेट दिली असून कोणत्यातरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बकरी ठार झाल्याचे सांगीतले. बिबट्या किंवा कोळशिंदे (रान कुत्री) यांच्या हल्यात ते ठार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कुत्रा ठार
वन्यप्राण्यांनी गोठ्यात घुसल्यावर कुत्रे त्याच्या अंगावर धावून गेले. त्यालाही प्राण्याने ठार केले आहे. पडणाऱ्या पावसामुळे त्या प्राण्याचे ठसे मिळालेले नसल्याने अजून तो प्राणी कोणता हे स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86366 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..