आजऱ्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशीची पातळी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशीची पातळी वाढली
आजऱ्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशीची पातळी वाढली

आजऱ्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशीची पातळी वाढली

sakal_logo
By

आजऱ्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशीची पातळी वाढली
आजरा, ता. 11 ः आजरा तालुक्यात पावसाची संततधार कायम असून अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पातळी वाढली आहे. दोनही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. साळगाव, चांदेवाडी, ऐनापुर बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाच्या माऱ्यामुळे ठिक- ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली आहेत. आज दिवसभरात बहिरेवाडी, आजरा, वझरे, मुरुडे, महागोंडवाडी, आवंडी, मडिलगे, दाभिल या गावात घरांची पडझड झाली आहे. सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. उचंगी प्रकल्प भरण्याच्या अंतीम टप्प्यात असून उद्या (ता. १२) हा प्रकल्प सकाळी भरेल,असे पाटबंधारे विभागाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86373 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..