भाजीपाला आवक घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाला आवक घट
भाजीपाला आवक घट

भाजीपाला आवक घट

sakal_logo
By

बाजार समिती लोगो आवश्‍यक
---
५० टक्के आवक घटली
भाजीपाला बाजारात २५ लाखांनी उलाढाल कमी; पावसाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. १३ ः पंधरा दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक पन्नास टक्क्यांनी घटली आहे, तर आवक झालेल्या भाजीपाल्यांचा उठाव होत नसल्याने भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात घाऊक बाजारपेठेतील रोजच्या उलाढालीत अंदाजे २५ लाखांची घट होत आहे.
शाहू मार्केट यार्डात बहुतांशी भाजीपाला कर्नाटक सीमावर्तीय तालुके तसेच सांगली, कराड भागातून येतो. या भागात सध्या पाऊस जोरदार आहे. नद्या, नाल्यांना पूर आले. मात्र, भाजीपाला वाहतुकीचा कोणताही मार्ग बंद झालेला नाही. तरीही भाजीपाल्याची आवक कमी झाली. पावसाचा जोर वाढता असल्याने बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साठले. त्यामुळे भाजीपाल्याची काढणी झालेली नाही तर काहीनी पावसाचा अंदाज घेऊन मागच्या आठवड्यात भाजीपाला काढला होता. त्यामुळे अनेकांच्या शेतीत भाजीपाला नाही. तसेच पावसामुळे मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याने कर्नाटकातील बहुतांशी शेतकरी जवळच्या बाजारात भाजीपाला विकून संपवत आहेत. परिणामी कोल्हापूरात येणाऱ्या भाजीपाल्यात घट झाली.
मार्केट यार्डात रोज सरासरी २५० ते ३०० गाड्या भाजीपाला येत असतो. सद्या अवघ्या शंभर ते दिडशे गाड्या भाजी पाल्याची आवक होते. यात शिरोळ, कागल, चिक्कोडी, इस्‍लामपूर तसेच कवठेमंहकाळ, शिरढोण येथून भाजीपाला येत आहे. यातही टॉमेटो व कोथिंबीरचे प्रमाण जास्त होते. मागणी कमी असल्याने भाव पडले. टॉमेटो शंभर रूपये दहा किलो तर कोथिंबीर ५०० रूपये शेकडा इथेपर्यंत घाऊक भाव घसरले. तरीही माल शिल्लक राहिला. असा शिल्लक माल पावसाळी वातावरणामुळे अवघ्या दोन दिवसात खराब झाला.
टॉमेटो व कोथिंबीरचा माल जवळपास दिड - दोन टन माल खराब झाला. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातून धडा घेत अन्य शेतकरी सद्या मार्केट यार्डाकडे भाजीपाला आणणे टाळत आहेत. जवळच्या गावातील आठवडी बाजारपेठेत भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यामुळे येथील भाजीपाल्याची आवक घटली आहे. पावसाची पूर्ण उघडीप होईपर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज अडत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

चौकट
कोकणातील भाजीपाला वाहतूक थंडावली
कोल्हापूरातील भाजीपाला आवक घटली. परिणामी कोल्हापूरातून रोज ३० ते ५० गाडी भाजीपाला कोकणात जातो. ही सर्व वाहतूक तूर्त ठप्प झाली. भाजीपालाही कमी झाला आहे. वाहतुकदारांना भाडे नाही, माथाडींना रोजगार नाही. त्यामुळे भाजीपाला बाजाराची उलाढालही घटली आहे.

कोट
पावसामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे. चांगल्या दर्जाच्या भाजीपाल्याला चांगला भाव जरूर मिळतो. मात्र सध्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. जोरदार वारे व पावसामुळे फिरते भाजी विक्रेते तसेच मंडईतील भाजीपाला विक्रेते जेमतेम भाजीपाला खरेदी करीत आहेत. त्यामुळे काही भाजीपाला शिल्लक राहून तो लवकर खराब होतो हेही नुकसान होते.
-युसुफ बागवान भाजीपाला विक्रेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86375 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..