भाजप रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप रॅली
भाजप रॅली

भाजप रॅली

sakal_logo
By

४२४०३

भाजपतर्फे बावड्यात दुचाकी रॅली
कोल्हापूर, ता. ११ ः भारतीय जनता पार्टीच्या कसबा बावडा मंडलातर्फे आज दुचाकी रॅली काढली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांच्या जनजागृतीसाठी ही रॅली काढली. येथील भगव्या चौकातून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला. भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत अराध्ये यांच्या उपस्थिती होती. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. भगवा चौक येथून सुरू झालेली ही मोटारसायकल रॅली चार नंबर फाटक तेथून लाईन बाजार व मुख्य रोड कसबा बावडा भगतसिंग वसाहत मार्गे, यशवंत कॉलनी पूर्ण करून बावड्यात फतेह अली पाणंदमार्गे शुगरमिल मुख्य रोडवरून ही रॅली संकपाळनगर येथे आली. तेथून आंबेडकर नगर, जय भवानी गल्लीमार्गे दत्त मंदिर परिसर तेथून बावड्यातील प्रमुख गल्ल्या पूर्ण करून वाडकर गल्लीतून कागलवाडीमार्गे कवडे गल्लीतून भगवा चौकात रॅलीची सांगता झाली. रॅलीत भाजप जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक प्रदीप उलपे, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, डॉ. सदानंद राजवर्धन, अमर साठे, रावसाहेब शिंदे, दादा खोत, विवेकराज राजवर्धन, संतोष पाटील, रवींद्र पवार, धीरज उलपे, तानाजी रणदिवे, संजय जासूद, मनोज इंगळे, राजेंद्र पवार, धीरज पाटील, विजय चव्हाण आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86379 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..