दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकणार
दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकणार

दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज फडकणार

sakal_logo
By

४२६१६
३०३ फूट उंचीचा
ध्वज उद्या फडकणार
तयारी पूर्ण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः पोलिस मुख्यालयातील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ३०३ फूट उंचीचा ध्वज शनिवारी (ता. १३) फडकणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रमास नूतन मंत्री चंद्रकांत पाटील, ‘नाबार्ड''चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती असेल.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा ध्वज १ मे २०१७ मध्ये पोलिस मुख्यालयात उभारला. अभिनेता अक्षयकुमार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. येथील ध्वजस्तंभावर ९० फूट लांब व ६० फूट रुंद अशा पाच हजार ४०० चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकविला. यानिमित्ताने पोलिस उद्यानाचाही कायापालट झाला. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे हा ध्वज काही दिवस फडकला नव्हता. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून शनिवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता येथे ध्वजवंदन होणार आहे. पोलिस बँडवर देशभक्तिपर गीतेही सादर होतील. सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रम होणार असल्याचे ‘भाजप''चे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86391 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..