वारणेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ
वारणेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ

वारणेच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ

sakal_logo
By

खोची,ता.११ :
पावसाची उघडझाप सुरू असल्याने तसेच आलमट्टी धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने
खोची परिसरात वारणा नदीची पूरस्थिती स्थिर आहे. चौवीस तासात फक्त एक ते दीड फुट पाणी पातळीत वाढ झाली आहे.दिवसभरात काही वेळ रिमझिम पाऊस वगळता आज पुन्हा दिवसभर उघडीप मिळाली.त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.नदीकाठची पिके आज तिसऱ्या दिवशी पाण्याखाली आहेत.ती धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहेत.
खोची ते दुधगाव दरम्यान नवीन पुलावरून वाहतूक सुरु होती.परंतू दोन्हीं बाजूच्या सखल भागातील रस्त्यावर पाणी पातळी आल्याने ही वाहतूक काल सायंकाळीं बंद झाली. पाणी पातळीत संथगतीने वाढ होत असल्याने येथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तरीसुद्धा अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी वारणा काठातून होत आहे.
फोटो -१- वारणा नदीने पुरामुळे विस्तारलेले पात्र.

कुरुंदवाड ता.११
पावसाचा जोर ओसरला तरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने कृष्णा- पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.कुरुंदवाड -शिरढोण, कुरुंदवाड- नांदणी ,कुरुंदवाड अब्दुललाट असे तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.दरम्यान आज सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी-पातळी 41 फूट 8 इंच तर कृष्णेची पाणी पातळी 42 फूट,7 इंच इतकी झाली आहे. राजापूर येथील कारदगे ओढ्यात पाणी आले आहे. जुन्या राजापूर रस्त्यावर पाणी आले आहे.
तेरवाड बंधाऱ्याची पाणी पातळी फूट57फूट,7 इंच,शिरोळ बंधाऱ्यांची पाणीपातळी 54फूट,6 इंच तर यादव पुला जवळ 53 फूट 6 इंच इतकी पाणी पातळी झाली आहे.तर कृष्णेच्या विसर्गात 28 हजार 750 ने वाढ झाली आहे.राजापूर बंधाऱ्यातून 1लाख 30हजार 250 क्युसेक्स पाण्याचा कर्नाटकला विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरीचे दरवाजे खुले झाल्याने तेरवाड बंधाऱ्याजवळ चार फुटाने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
कुरुंदवाड अनवडी व कृष्णा नदी परिसर ,अकिवाट, राजापूर ,खिद्रापूर आणि शिरढोण परिसराची नदीकाठ परिसराची प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे यांनी पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. हेरवाड- अब्दुल लाटसह कृष्णा पंचगंगा नदीचे पाणी वाहतुकीच्या रस्त्यावर आले असल्यास ते रस्ते तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.खरात यांनी ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाला दिले आहेत.


ich1110.txt

फोटो फाईल - ich1112,13.jpg

फोटो ओळ - इचलकरंजी ः 1) हुपरीकडे जाणा-या मार्गावर पंचगंगा नदीपात्रातील पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा) 2) पंचगंगा नदीकाठावरील वरद विनायक मंदिरात शिरलेले पूराचे पाणी. (छायाचित्र ः छोटूसिंग)

इचलकरंजी, ता.11 ः येथील पंचगंगा नदीतील पूराचे पाणी आता नागरी वस्तीनजिक आले आहे. दिवसभरात आठ इंच पाणी वाढले आहे. पावसाचा जोर वाढला तर नागरी वस्तीत पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे.
दिवसभरात सकाळच्या सत्रात पावसांने दडी दिली होती. मात्र सांयकाळी पून्हा पावसाचा जोर वाढला. तर पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी सकाळी 8 वाजता 65 फुट 6 इंच इतकी होती. सांयकाळी 8 वाजता 66 फूट 2 इंचावर पूराची पातळी पोहचली होती. त्यामुळे पूराचे पाणी शेळके गल्ली, कटके गल्ली, बागवान पट्टी परिसराजवळ आले आहे. पुढील कांही तासांत पूराचे पाणी या नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नदीकाठ परिसर पूर्णतः जलमय झाला आहे. काठावरील वरद विनायक मंदिर, रेणूका मंदीर परिसर पूराच्या पाण्याखाली आला आहे. हुपरीकडे जाणा-या मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्ग सद्या बंद करण्यात आला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फुट आहे. इशारा पातळीच्या दिशेने पूराच्या पाण्याची वाटचाल सुरु आहे. तर पूर पाहण्यासाठी नव्या पूलावर मोठी गर्दी होत असून वाहतूक विस्कळीत होत आहे.

कोंडेकर
---8.00-----

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86404 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..