खड्यांचा त्रास सोसवेना, प्रवाशांची होतेय दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्यांचा त्रास सोसवेना, प्रवाशांची होतेय दैना
खड्यांचा त्रास सोसवेना, प्रवाशांची होतेय दैना

खड्यांचा त्रास सोसवेना, प्रवाशांची होतेय दैना

sakal_logo
By

42851
आजरा : आजरा-गडहिंग्लज मार्गावर मयुर पंपावर पडलेला खड्डा.

खड्ड्यांचा त्रास सोसवेना,
प्रवाशांची होतेय दैना
आजरा-गडहिंग्लज रस्त्याची दुरवस्था; वाहनधारकातून संताप, डागडुजीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १४ : आजरा-गडहिंग्लज व आजरा-आंबोली मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात वाहनधारकांचे अपघात होत आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवाशांची चांगलीच दैना झाली असून खड्ड्यांचा त्रास सोसवेनासा झाला आहे. वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांची तत्काळ डागडुची करावी, अशी मागणी होत आहे.
आजरा-आंबोली व आजरा-गडहिंग्लज मार्ग खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. आजरा-गडहिंग्लज मार्गावर आजरा सूतगिरणी, मसोबा देवालय, व्हिक्टोरिया पूल, विश्रामगृह, आजरा पंचायत समिती, संभाजी चौक, आजरा पेट्रोलपंप, ‘महावितरण’ कार्यालय या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. पाणी साठल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी खड्ड्यांत जाऊन अपघात होत आहे. येथील मयुर पेट्रोल पंपाजवळ सहा-सातजण दुचाकीवरून पडून जखमी आले आहेत. त्याचबरोबर दुचाकींचे नुकसान होत असल्याने वाहनधारकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवले होते. पावसाच्या पाण्यामुळे पुन्हा खुले झाले आहेत. बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, अशी विचारणा वाहनधारक, प्रवासी करीत आहेत. त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.
--------------
चौकट
देखभाल-दुरुस्तीमध्ये अडकला रस्ता
हा रस्ता राष्ट्रीय विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी कोणी करायची, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळ यामध्ये समन्वय दिसत नाही. त्यामुळे खड्डे कुणी बुजवायचे व देखभाल-दुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86631 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..