मनसेची मडिलगे ग्रामपंचायतीसमोर निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेची मडिलगे ग्रामपंचायतीसमोर निदर्शने
मनसेची मडिलगे ग्रामपंचायतीसमोर निदर्शने

मनसेची मडिलगे ग्रामपंचायतीसमोर निदर्शने

sakal_logo
By

42861
मडिलगे (ता. आजरा) : येथे सरपंच जी. एम. अरळगुंडकर यांना निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले व अन्य पदाधिकारी.

मडिलगे ग्रामपंचायतीसमोर
मनसेची निदर्शने
आजरा, ता. १४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मडिलगे ग्रामपंचायतीसमोर निदर्शने केली. जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाबाबत तक्रार करून देखील त्याची दखल न घेतल्याबाबत निदर्शने झाली. या योजनेंतर्गत गावातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. पण खोदलेल्या चरी व्यवस्थित बुजवलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे, याचा जाब मनसेने विचारला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, ‘‘संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंद करावा. त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी सूचना केली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास सरपंच व ग्रामसेवकांना खुर्चीत बसू देणार नाही.’’ या वेळी झालेल्या चर्चेत मनसे पदाधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांत शाब्दिक चकमक झाली. येत्या पंधरा दिवसांत रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल, जिल्हा महिला अध्यक्ष पूनम भादवणकर, तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे, तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सरिता सावंत, तालुका उपाध्यक्ष कमलेश येसादे, आश्‍विन राणे, म्हंकाळी चौगुले, सुनील पाटील, वसंत सावंत, छाया लोहार, शोभा कांबळे, वंसत घाटगे, चंद्रकांत इंगळे, मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86657 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..