रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

लोगो-- शिल्प सौंदर्य
42908


राजाराम महाराजांचा अर्ध पुतळा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर करवीर संस्थांनचे छत्रपती म्हणून आलेले आणि आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या सुधारणा आणि विकासाची मोठमोठी कामे अत्यंत शांतपणे पूर्णत्वास नेणारे राजाराम महाराज यांचा न्यू पॅलेसमधील कास्य धातूमधील अर्ध पुतळा समारंभप्रसंगी वापरतात, त्या पद्धतीचा अंगावर अत्यंत अलंकृत असा झब्बा असून, स्थूल शरीरासोबत या वस्त्रांची काहीशी ढगळी बांधणी अनुभवताना त्यावर धारण केलेले अलंकार, पदके आणि गळ्यातील मोत्याच्या माळेसोबत असणारी कवड्यांची माळ गळ्याभोवती असणाऱ्या नक्षीकाम केलेल्या कॉलरबाहेर सहजपणे असल्याचे दिसून येते.
मध्यम वयातील स्तुल चेहऱ्यावर असणारा संयमी भाव डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा पुनर्रांकित झाल्याचे अनुभवायला मिळते. कपाळाच्या मध्यावर फेट्यामधून काही केस बाहेर आलेले दर्शवताना शिल्पकार डोंगरसाने यांनी डोक्यावरील अलंकृत कोल्हापुरी फेटा अत्यंत सौम्य आणि सहजपणे बांधल्याप्रमाणे शिल्पांकन करून त्यामध्ये एकूणच शिल्पात सोज्वळ भाव साधला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86756 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..