हद्पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्पार
हद्पार

हद्पार

sakal_logo
By

४३०११

सकटे टोळीतील चौघे
सहा महिन्यांसाठी हद्दपार
संशयित कनाननगरातील; गंभीर गुन्ह्यांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः मारामारी, गंभीर दुखापत, आर्म ॲक्ट अ गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या कनाननगरातील भोल्या सकटे टोळीतील चौघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. शाहूपुरी पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंजुरी दिली. या टोळीवर आठ गुन्हे दाखल आहेत. अजय ऊर्फ भोल्या लमुवेल सकटे (वय २५), विजय ऊर्फ गदर लमुवेल सकटे (२२), प्रमोद ऊर्फ सोन्या दाविद सकटे आणि किरण ऊर्फ प्रशांत दाविद सकटे (वय २६, कनाननगर) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, हेडकॉन्स्टेबल ऋषीकेश पवार, नाईक युवराज पाटील, मिलिंद बांगर, लखन पाटील, सागर माने, शुभम संकपाळ, दिग्विजय चौगुले यांनी ही कारवाई केली.

--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86828 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..