संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

गुरुदेव विद्यानिकेतनमध्ये विविध कार्यक्रम
कोल्हापूर : फुलेवाडी येथील महर्षी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेच्या श्री गुरुदेव विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत संस्थेचे ज्येष्ठ संचालक नागोजीराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रमही घेण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, देशभक्तिपर समूह गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धा शाळेतील मासिक उपक्रम विभागामार्फत घेण्यात आल्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष जयसिंग माने, ज्येष्ठ संचालक के. जी. इंगवले, प्रकाश इंगवले, सदाशिव पाटील, शाळेचे मुख्याध्यापक किरण यादव, विभागप्रमुख एम. एम. दिवसे, राधिका पाटील, एम. बी. साखळकर, नितीन पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले.


प्रथमेशनगरमध्ये मुलांची तिरंगा रॅली
कोल्हापूर : प्रथमेश नगर मधील अंगणवाडी क्र. १८२ येथे आजादी का अमृत महोत्सवा निमित्ताने मुलांची तिरंगा रॅली आणि पालकांसाठी तिरंगा पाककला कृती स्पर्धा आयोजित केली होती. तिरंगा रॅलीचा प्रारंभ माजी सैनिक दिलीप हंकारे व दत्तात्रय पंडे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी दिलीप खांबे व मंगला भोई, सुप्रिया वाडकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित तिरंगा पाककृती स्पर्धेत पालकांनी तीन रंगाच्या इडली, ढोकळा खोबऱ्याची बर्फी, अप्पे, मोदक असे विविध पदार्थ केले होते. अंगणवाडी सेविका गीता पाटील व पूनम पाटील यांनी स्पर्धेचे आयोजन केले. सरिता निंबाळकर व सुनीता सुतार यांनी परीक्षण केले.


ढोलताशा वादकांसाठी
उद्याआरोग्य शिबिर
कोल्हापूर ः आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत सोमवारी (ता. १५) ढोल-ताशा पथकांतील वादकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये कान, नाक व घसा विकार, हाडांच्या सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासण्या, मलेरिया, डेंगी, चिकनगुण्‍या अशा साथीच्या रोगांवरही उपचार करण्यात येतील. सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत बागल चौकातील सदिच्छा संस्था हॉल येथे हे शिबीर होईल. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पंख फाउंडेशन, महालक्ष्मी प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86838 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..