जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

43021
कोल्हापूर : सतीश मच्छिराजू यांच्या हस्ते दामोदर शिवराम कंपनी यांना चावी सुपूर्द केली. सोबत मान्यवर.

चेतन मोटर्स सेवा देणारे
सर्वोत्तम केंद्र : सतीश मच्छिराजू

कोल्हापूर, ता. १३ : चेतन मोटर्स हे टाटा मोटर्ससाठी सेवा देणारे सर्वोत्तम केंद्रांपैकी एक असल्याचे गौरवोद्‌गार टाटा मोटर्सचे ‘आयएलसीव्ही’ हेड सतीश मच्छिराजू यांनी काढले. चेतन मोटर्सच्या कोल्हापूरसह सांगली, डिग्रज येथील शोरूमला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी दर्शन भोसले, मधूर शर्मा, हिमांशू सचदेव उपस्थित होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील टाटा कमर्शियल व्हेईकलसाठी चेतन मोटर्स हे अधिकृत विक्रेते असून १८ वर्षे ग्राहकाभिमुख सेवा देत आहे. भेटी दरम्यान त्यांनी चेतन मोटर्सचे शोरुम, वर्कशॉपला आदींना भेट देऊन चेतन मोटर्सच्या कामाची माहिती घेतली. चेतन मोटर्सतर्फे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले. चेतन मोटर्सच्या नॅशनल हायवे ४ वर असणाऱ्या कामेरी येथील शाखेतून रात्री अपरात्री हायवेवर बिघाड झालेल्या वाहनांना देण्यात येणाऱ्या ब्रेक डाऊन सर्व्हिसची त्यांनी प्रशंसा केली. या भेटीचे औचित्य साधून श्री. मच्छिराजू यांच्या हस्ते चेतन मोटर्सचे ग्राहक दामोदर शिवराम कंपनी यांना टाटा ४०७ गोल्ड या वाहनाची चावी सुपूर्द केली. १८ वर्षे सुरू असणारी ग्राहकाभिमुख सेवा येणाऱ्या काळातही अशीच सुरू राहील, अशी ग्वाही घाटगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना दिली. यावेळी चेतन मोटर्सचे बिझनेस हेड जितेंद्र माळी, किशोर फाळके व चेतन मोटर्सचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86866 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..