टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

43056
गडहिंग्लज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घराघरांवर डौलाने फडकणारे राष्ट्रध्वज. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


घरावर फडकला डौलाने तिरंगा
गडहिंग्लज तालुक्यात विधवा, माजी सैनिकांना ध्वजवंदनाचा मान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. यानिमित्ताने आज सर्वसामान्य कुटुंबांच्या घरावरही डौलाने तिरंगा फडकला. शहरासह तालुक्यात सुमारे २० हजार कुटुंबांनी ध्वज फडकविला. शासकीय कार्यालय, सहकारी संस्थांनीही आज ध्वजवंदन केले. विधवा महिला, माजी सैनिकांना हा मान देण्यात आला होता.
येथील पंचायत समितीत विधवा परिचर मंगल पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. गटविकास अधिकारी शरद मगर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसमोरही विधवा महिलांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यातून विधवा सन्मान चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ग्रामपंचायतीसह शाळा, सहकारी संस्थांनी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यंदा प्रथमच अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रासमोरही ध्वजवंदन झाले.
शहरासह ग्रामीण भागात हर घर तिरंगा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविला. अनेक कुटुंबांनी महिलांना मान दिल्याचे दिसून आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही प्रथमच संधी मिळाल्याने तिरंग्यासोबत सेल्फी घेतली जात होती. आपल्या घरावर फडकविलेल्या राष्ट्रध्वजासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y86913 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..